कुतुहूल प्राचीन ममीच्या शाबूत केसांचे


वेब टीम : मॉस्को
तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका ममीच्या डोक्यावर अजूनही केस अस्तित्वात आहेत. इतकी वर्षे हे केस कसे टिकून राहिले असतील याचे संशोधकांना कुतुहल वाटत होते.

आता त्यांना असे दिसून आले आहे की पिस्त्याचे तेल व देवदार वृक्षाचे डिंक आदी काही नैसर्गिक साधनांनी ते सुरक्षित करण्यात आले होते.

याबाबत मॉस्कोमधील कुर्चतोव्ह इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी संशोधन केले. प्राचीन इजिप्तमधील तीन ममींचा यासाठी अभ्यास करण्यात आला. हजारो वर्षांपूर्वीच्या ममींच्या केसांचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले.

या ममींच्या केसांवर देवदार वृक्षाच्या डिंकापासून बनवलेल्या एका रसायनाचा वापर झाला होता असे त्यांना दिसले. संशोधकांनी या केसांचे इन्ङ्ग्रारेड स्पेक्ट्रमच्या सहाय्याने निरीक्षण केले. त्यांना असे दिसले की केसांना लावलेल्या या रसायनात गुरांची चरबी, पिस्त्याचे तेल आणि मधमाश्यांच्या पोळ्यातील मेणाचा वापर केला आहे.

त्यामुळे हजारो वर्षांनंतरही हे केस अद्यापही सुरक्षित आहेत! त्या काळात मृतदेहांना सुरक्षित ठेवण्यासाठी मृतदेहासाठी एक लेप आणि केसांसाठी वेगळा लेप बनवला जात असे.

Post a Comment

0 Comments