मोदींच्या विरोधात टाकली फेसबुक पोस्ट; पोलीस उपनिरीक्षक निलंबित


वेब टीम : भद्रोही
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्ट लिहिणे उत्तर प्रदेशातील एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले. प्राथमिक चौकशीनंतर या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस दलातून निलंबित केले गेले.

भगवान प्रसाद असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो अँटी सबोटाज टीममध्ये होती. फेसबुकवर तो वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहित असल्याच्या तक्रारी पोलीस खात्याकडे आल्या होत्या.

पोलीस दलातील सोशल मीडिया सेलचेही त्याच्याकडे लक्ष होते. सोशल मीडिया सेलनेही त्याच्याविरोधात एसपी राम बदन सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. सिंह यांनी स्वत: भगवान प्रसाद यांचे फेसबुक खाते पाहिले होते.

त्यात त्याने मोदींविरोधात लिखाण केल्याचे आढळले.तसेच मोदीं विरोधातील कोणताही मजकूर तो लाइक आणि शेअर करत असल्याचे ही दिसले. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या त्याला दोषी धरून निलंबित केले असून त्याच्या सखोल चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. चौकशी झाल्यानंतर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे.

Post a Comment

0 Comments