करिअर करतांना मुलांचा अडथळा होतो का ? या विषयावर भाष्य करणारे नाटक "सीडलेस"
६५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा १०वा नाट्य प्रयोग श्रीरामपूरच्या कर्णेज ऍकेडमी च्या नाट्य संघाने सीडलेस हे नाटक सादर केले.
अहिल्यानगर : मिहीर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये अनेक कंपन्यांचा मॅनेजिंग डायरेक्टर असतो.त्याची बायको नेहा देखील एका कंपनीची मालकीण असते. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झालेली असतात. पण मिहीरला मुलबाळ नको असते आणि त्याच अटीवर त्याने नेहाशी लग्न केलेले असते.त्याचा मित्र राहुल तीन घटस्फोट घेतल्यानंतर चौथ्या बायको बरोबर पहिल्या तीन बायकांपासून झालेल्या पाच मुलांसह राहत असतो.तो बालरोग तज्ञ म्हणून अमेरिकेत राहून काम करत असतो.भारतात आल्यानंतर तो मिहीरला भेटायला येत असतो.त्यांच्या बोलाचालीतून मिहीर एकदा राहुलला माणसानं सर्व सुख उपभोगावीत मात्र कशात अडकून पडू नये.छान "सीडलेस ग्रेप्स" सारखं जगावं असं सांगतो.आता माझंच बघ ना मी नेहा सारख्या सुमार दर्जाच्या मुलीला एक यशस्वी उद्योजक म्हणून जगासमोर आणलच कि नाही? येस आय ऍम अ मेकर ... असं म्हणतो. तर दुसऱ्या प्रसंगात नेहा राहुलशी बोलतांना मिहीर कर्तृत्ववान आहे, पण त्याला त्याचा खुप अहंकार आहे आणि तो खूप जास्त महत्वाकांक्षी पण आहे. त्यामुळे तो कधीच इतरांचे वर्चस्व मान्य करत नाही.एके दिवशी नेहाच्या पोटात खूप दुखू लागते तिला उलट्या होतात म्हणून ती एका स्त्री रोग तज्ञाकडे जाते तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समजते तसं ती मिहीरला सांगते.त्यामुळे मिहीर आणि नेहामध्ये वादावादी होते.नेहाला मूल हवे असते त्यातून वाद विकोपाला जातो आणि नेहा घर सोडून जाते.
मिहीर बरोबर मीनल नावाची एक मुलगी काम करत असते.ती मध्यमवर्गीय असल्याने मिहीर तिच्या अडचणींवर आणि असहायतेवर बोट ठेऊन तिला आपल्या जाळ्यात ओढतो तिलाही यशस्वी उद्योजिका होण्याचे स्वप्न दाखवतो मात्र ती आधीच एका मुलाच्या प्रेमात असते पण ती घरच्या परिस्थितीला कंटाळलेली असते मिहीर बरोबर लग्नास तयार होते.
राहुल नेहमी नेहा आणि मिहीर च्या संपर्कात असल्याने.एक दिवस मिहीरला नेहाचा गर्भपात झाला असल्याचे सांगतो.मिहीरला खूप आनंद होतो. मात्र इतक्यात नेहा त्याला मूल दत्तक घेणार असल्याचे सांगते.मिहीर आणि मीनलच्या लग्नाला पाच वर्ष लोटतात मीनल देखील एक मोठी उद्योजिका म्हणून नावारूपाला येते.अश्यातच एक दिवस नेहा मिहीरकडे येते आणि तिने दत्तक घेतलेली मुलगी हि मूक बधिर असल्याने आणि इथून मूक बधिरांची शाळा जवळच असल्याने त्याच घरात वरच्या खोलीत राहणार असल्याचे सांगते. त्या घरात तिचा देखील हिस्सा असल्याने मिहीर तिला नकार देऊ शकत नाही.शेवटी वरच्या मजल्यावर नेहा व तिची मुलगी परी आणि खाली मिहीर आणि मीनल असा संसार सुरु होतो.
परीची मिनलशी जवळीक निर्माण होते.परी मूक बधिर असली तरी हुशार असते.मीनल आणि परी मधली जवळीक मिहीरला खटकते. म्हणून तो वरच्या खोलीचा घरातून जाणारा दरवाजा बंद करून टाकतो.तरीही मीनल आणि परी यांच्यातील जवळीक कायम राहते.मीनल आणि परी एकत्र नृत्य करण्यात,साप शिडी खेळण्यात वेळ घालवत असतात.इतक्यात मिहीर येतो तेव्हा मीनलचा फोन वाजतो तो तिच्या प्रियकराचा असतो. त्यांनतर मिनलची व मिहीरची वादावादी होते आणि मीनल आपल्या प्रियकराकडे निघून जाते. ती जातांना मिहीर तिला अडवू पाहतो पण ती थांबत नाही.तेव्हा मिहीरचा बी.पी वाढल्याने तो चक्कर येऊन पडतो. तेव्हा परी नेहाला आणि राहुलला मेसेज करून कळवते.तात्काळ उपचार मिळाल्याने मिहीरला सौम्य लकव्याचा झटका बसतो. मात्र या प्रसंगातून मिहीर आणि परीची जवळीक वाढते.मिहीरला त्याच्या वडलांची आठवण होते.मिहीरची आई तो लहान असतांना वारल्याने त्याचे वडील त्याचा सांभाळ करतात. मुलात अडकून पडल्याने त्यांना नौकरीत प्रमोशन घेता येत नाही.त्यांच्या बरोबर काम करणारे प्रमोशन घेऊन पुढे जातात.एकदा ते मिहीरला झोपवतांना त्याच्या कानाखाली मारतात. तुझ्यामुळे मला प्रमोशन घेता येत नाही म्हणून त्रागा करतात.मिहीरच्यासमजत्या वयात हा प्रकार झाल्यनाने हि घटना त्याच्या मनावर कोरली जाते.एक दिवस मिहीर एका तिसऱ्या तरुणीला मला तुझ्यात उद्याची मोठी उद्योजिका दिसते मात्र त्यासाठी तुला माझ्या मार्गदर्शनाची गरज आहे असे सांगून पटवण्याचा प्रयत्न करत असतो.इतक्यात नेहा परीला घेऊन नवीन जागी राहायला निघते.मिहीर त्यांना थांबवू पाहतो मात्र त्या दोघी निघून जातात.इथेच पडदा पडतो.
अश्या आशयाच्या संहितेचे लेखन रवींद्र भगवते यांनी केले असून दिग्दर्शन नवनाथ कर्डीले यांनी केले आहे.कर्डीले यांनी दिग्दर्शक म्हणून कथानकाला चांगला न्याय दिला. मिहीरच्या भूमिकेत अदित्य नगरकर याने जबाबदारी उत्तम निभावली.एक कर्तृत्ववान हुशार व्यक्तिमत्व त्यांनी चांगल्या पद्धतीने साकारले.न्हेच्या भूमिकेत आकांक्षा गर्जे याही रंजमंचावर आत्मविश्वासाने वावरल्या, राहुलची भूमिका मयूर सोर यांनी नेटक्या पद्धतीने निभावली. मीनलच्या भूमिकेत जान्हवी साठे यांनी माध्यम वर्गीय युवती चांगल्या प्रकारे उभी केली.परीच्या भूमिकेत शुभ्रा वाकचौरे भाव खाऊन गेली.तर तरुणीच्या भूमिकेत मोनिका सोर आणि सुताराच्या भूमिकेत अशोक कर्णे यांनी रंगमंचावर हजेरी लावली.
परी आणि मीनल सापशिडी खेळतांना मीनलचा मोबाईल वाजतो मात्र तिने टी व्ही चा रिमोट घेऊन फोन उचलल्याचा अभिनय केला. हे प्रेक्षकांच्या नजरेतून सुटले नाही.अनेकदा मूक बधिर असलेल्या परीशी इतर पात्रांनी खाणाखुणां ऐवजी संवाद साधल्याने तेही प्रेक्षकांना खटकले.प्रा.अशोक कर्णे यांनी या नाटकाचं नेपथ्य मिहीरच घर,सुटसुटीत पणे साकारलं त्यांना प्रकाश ढोणे आणि संदीप कदम यांनी सहाय्य केले.नाटकाच्या संगीताची बाजू मयूर वाकचौरे यांनी चांगली सांभाळली.नाटकाची वेशभूषा काजोल गायकवाड व शर्मिला कचेरीया यांनी तर रंगभूषा निकिता नगरकर व रेखा वाकचौरे यांनी नाटकाला साजेशी केली.नाटकाची प्रकाश योजना नवनाथ कर्डीले यांनी चांगली सांभाळली त्यांना सहप्रकाश योजनाकार म्हणून अर्जुन तिरमखे यांनी केले.रंगमंच व्यवस्था गणेश करडे,सौरभ संकपाळ,प्रतीक मोढे यांनी पहिली.
एकूणच सीडलेस चा नाट्य प्रयोग स्पर्धेला साजेसा झाला.
देविप्रसाद अय्यंगार









0 Comments