'झाडे लावा,झाडेजगवा' मोहिमेला लावला काळीमा
नगर: राज्य सरकारने पर्यावरणाचे संवर्धन साधण्यासाठी सुरू के लेल्या 'झाडे लावा, झाडे जगवा'
या मोहिमेला हरताळ फासला. भाळवणी प्राथमिक आरोग्य कें द्रात अवैधरित्या वक्षृ तोड करण्यात
आली. शासकीय आवारातील वक्षृ तोड ही विनापरवानगी करण्यात आली .एकीकडे राज्य सरकार
झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेवर खर्च करत असताना भाळवणी च्या शासकीय आवारातील
वक्षृ तोडीने या मोहिमेलाच काळीमा फासण्याचे काम केले आहे.
या वृक्षांमुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना सावलीचा आधार होत होता. या
वक्षृ तोडीचे कारण अद्याप उघड झाले नाही. भीमाशंकर कर्जत भागातील जंगल तोडीचे प्रकरण
ताजे असताना भाळवणी शासकीय आवारातील वक्षृ तोड हा संवेदनशील मुद्दा बनला आहे. पारनेर
तालुका हा दुष्काळी तालुका असताना या वक्षृ तोडीने काय साध्य झाले? पर्यावरण संवर्धनाचा
समतोल साधला जाणार का ?असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले.
या अवैधरित्या शासकीय आवरतील के लेल्या वक्षृ तोडीवर जिल्हा प्रशासन, वन विभाग
काय कार्यवाही करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास
ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचे जीव गेले .इथे मात्र नैसर्गिकरीत्या
झाडांद्वारे मिळणारा ऑक्सिजन वरच कुऱ्हाड चालवली गेली आहे. हे सर्व घडले प्राथमिक
आरोग्य कें द्रात ज्या आरोग्य कें द्रात रुग्णांचे जीव वाचवले जातात. त्याच आरोग्य कें द्रात झाडांची
मात्र खुलेआम कत्तल करण्यात आली.
.....तर कारवाई करण्यात येईल
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वक्षृ तोड करण्यात आली आहे. तालुका आरोग्य
अधिकाऱ्यांमार्फत वक्षृ तोडीची चौकशी करू त्यात नियमबाह्य काम आढळल्यास संबंधित वैद्यकीय
अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. बापूसाहेब नागरगोजे
जिल्हा आरोग्य अधिकारी
कडक कार्यवाही केली जाईल..
शासकीय आवरतील वक्षृ तोड करण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. प्राथमिक आरोग्य
केंद्राच्या आवारातील वक्षृ तोडीसाठी वन खात्याची परवानगी घेतली नव्हती. विनापरवानगी जर
कोणी वक्षृ तोड केली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
गजानन धाडे
वनपरिक्षेत्र अधिकारी
उडवाउडवी ची उत्तरे दिली..
शासकीय आवारातील वक्षृ तोडी संदर्भात वनविभाग , जिल्हा प्रशासन यांची परवानगी घेतली होती
का ?असे विचारले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोदे यांनी उडवाउडवीची उत्तरे
दिली.
झाडे जगवणे हे कार्यालयास बंधनकारक :
शासकीय कार्यालयांना राज्य सरकार दरवर्षी झाडे लावून जगवण्याचे टार्गेट देते. त्याप्रमाणे झाडे
लावून जगवणे हे प्रत्येक कार्यालयाला बंधनकारक आहे. शासकीय आवारातील झाडे ही सार्वजनिक
झाडे आहेत. ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. सरकारी आवारातील वक्षृ तोड ही खूप गंभीर
बाब आहे. वक्षृ तोड करण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अवैधरित्या
वक्षृ तोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.
सुरेश खामकर
अध्यक्ष, हरियाली संस्था





0 Comments