दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या.....
शहराला उत्सवी स्वरूप ,मात्र दिवाळीवर दुष्काळाचे सावट
नगर : अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपल्याने नगरची बाजारपेठ सजायला सुरुवात झाली आहे. कापड बाजार व इतर पेठांचे रस्ते ही गजबजायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठेच्या ठिकाणी दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटू लागल्याने शहराला एक प्रकारे उत्सवी स्वरूप येऊ लागले आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्याने दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट पडलेले दिसते, मात्र यंदा दिवाळी नोव्हेंबरचा पहिल्याच आठवड्यात असल्याने तसेच नोकरदार वर्गाच्या खिशात पगार, बोनस आधीच्या स्वरूपात पैसाही असल्याने दुष्काळाचे सावट काहीसे कमी होताना दिसत आहे.
सहज बाजारपेठेत फेरफटका मारताना आता आकाशदिव्यांची, विद्युत रोषणाईच्या दुकानांमुळे तसेच इतर शोभेच्या हार फुलांच्या माळा , रांगोळ्यांची दुकाने सजलेली दिसत आहेत, नगरचा लक्ष्मी रोड मानल्या जाणाऱ्या कापड बाजारातही रोषणाई केली असल्याने यंदा झगमगाट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कापड खरेदीवर करून शिलाई करून घेण्यापेक्षा तयार कपडे घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याने तयार कपड्यांच्या दुकानातही खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.
दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळाची लगबग वेळी घराघरातून सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. घरांची रंगरंगोटी करून आता घरातील मंडळी फराळाच्या पदार्थ करण्यात गर्क आहेत. यंदा तयार फराळांची काही दुकाने सुरू होताना दिसत असून यंदा दुष्काळी परिस्थिती मुळे किराणामालाचे भावही वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
नगर कल्याण रस्त्यावर तसेच मार्केट यार्ड समोर फटाक्याची दुकाने सुरू आहेत. यंदा फटाक्यांच्या किमतीतही फारशी वाढ झालेली नसली तरी फटाका विक्रीवर दुष्काळी परिस्तिथीचे सावट दिसत असून यंदा आवाजाच्या फटाक्यांना ऐवजी रंगबेरंगी आकाश बाजी करणाऱ्या फटाक्यांची बाजारात रेलचेल आहे. याव्यतिरिक्त दिवाळीच्या आकाशदिव्यांची दुकाने अनेक ठिकाणी थाटली असून यंदा पारंपारिक आकाश दिव्यांबरोबरच आधुनिक पद्धतीच्या आकाश दिव्यांची ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत .
दिवाळी म्हटलं की घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात यंदा रांगोळी तरी लाकडी साच्यांची बाजारात रेलचेल असून त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणीआहे.
त्याचबरोबर लागणारे वेगवेगळे रंगरांगोळी ची बरोबरच रांगोळ्याच्या स्टिकरच्या उंबर पट्ट्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे.
एकूणच वातावरणात दिवाळीची लगबग सुरू असून त्यासाठी बाजारपेठ फुलल्याचे सजल्याचे चित्र दिसत आहे.





.jpg)

0 Comments