वर्षभर निवडणुका लांबुद्यात मात्र मतदार याद्या पारदर्शक करा

लाखो दुबार मतदार राज ठाकरे यांचा आरोप 

वर्षभर निवडणुका लांबुद्यात मात्र मतदार याद्या पारदर्शक करा 

 मुंबई: - मुंबईसह महाराष्ट्रात अनेक दुपार मतदार यादी मध्ये समाविष्ट आहेत निवडणूक आयोगाच्या कटकारस्थान करून  मॅच फिक्सिंग केली जाते उन्हात उभा राहणाऱ्या मतदारांचा अपमान केला जातो.  उद्या निवडणुका होईल तेव्हा जर दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा असा घणाघात मनसे प्रमुख राज्य ठाकरे यांनी केला आहे.  विरोधी पक्षाच्या सत्याचा मोर्चात  ते बोलत होते.  या मोर्चात ठाकरे यांनी दुबार मतदारांचा ढीगच  जनतेसमोर दाखवला.  

यावेळी राज ठाकरे म्हणाले  की, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे.  दिल्लीपर्यंत समजण्याचा आणि समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे.  मोठ्या ताकदीने आज तुम्ही या मोर्चाला जमलात  त्याबद्दल आभार.  मतदार यादीत दुबार मतदार आहेत . सर्व पक्षांचे लोक यादीत  दुबार मतदार असल्याचे बोलतात मग निवडणूक घेण्याची घाई कशाला, मतदार याद्या पारदर्शक केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील . 

कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी साडेचार हजार मतदारांनी मलबार हिल मतदार संघात ही मतदान केले आहे.  प्रभाकर तुळशीराम पाटील, राम भोईर, पुंडलिक भोईर या लोकांनी त्यांच्या मतदारसंघातही मतदान केले मलबार हिल मध्येही  मतदान केले अशा प्रकारे लाखो मतदार आहेत . असा त्यांनी आरोप केला. 

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७लाख २९ हजार  मतदारांपैकी ६२हजार ३७०मतदार दुबार आहेत.  दक्षिण मुंबईत १५ लाख १५ हजार ९९३ मतदारांपैकी ५५ हजार मतदार दुबार आहेत मावळमध्ये एक लाख पंचेचाळीस हजार ६३६दुबार मतदार आहेत.  पुणे एक लाख २०१ठाणे दोन लाख नऊ हजार दुबार मतदार या सर्वांच्या आकडे सांगताना संपूर्ण मतदारांचा डेटा राज्य ठाकरे यांनी दाखवू नये एवढे मतदार दुबार असताना जानेवारी महिन्यात निवडणूक कशाला घेता एक वर्ष निवडणूक लाभले तरी काय फरक पडतो मतदार याद्या पारदर्शक केल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

दरम्यान अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मतदार यादीतून समोर येत आहे मी २०१७ पासून ईव्हीएम मशीन बाबत सांगतोय२३२ आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात सन्नाटा असेल मतदार गोंधळलेले होते ही सगळी कारस्थानी निवडणूक आयोगाच्या कटकार असतानातून केली जात आहेत नाश आधीच फिक्स आहे मतदारांचा अपमान केला जातो तुम्ही घराघरात जा सर्वांचे चेहरे मतदार यादीनुसार पहा जेव्हा कधीही निवडणूक होईल जर दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे बडवायचे आणि मग पोलिसांच्या हाती द्यायची त्याशिवाय हा महाराष्ट्राचा कारभार वाटणीवर येणार नाही असा इशारा राजे ठाकरे यांनी दिला आहे 

या मोर्चाच्या वेळी शिवसेना उभाटाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ,काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ,विजय वडेट्टीवार यांचीही भाषणे झाली त्यांनीही उपस्थित मतदारांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments