लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर पावसाने विरझण

   लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर पावसाने विरझण 

पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्यावर ते मध्यम सरींचा अंदाज 

नगर : आकर्षक रांगोळी आकाश कंदील आणि रोषणाईचा झगमगाठी यावा अशा वातावरणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, ठाणे ,अहिल्यानगर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणांच्या आनंदावर विरजण पडले लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधून खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अनय अचानक झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्यावर ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


काही दिवसापूर्वी जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले शेती पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले  अशातच ऐन  दिवाळीच्या दिवशी पाऊस झाल्याने नागरिकांच्या उत्साहावरही पाणी पडले.  आज सकाळपासूनच प्रचंड ऊष्मां  जाणवत होता.  सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास आकाश  ढगांनी आकाश व्यापून गेले होते.  साडेबाराच्या सुमारास पावसात सुरुवात झाली . नगर शहरात रिमझिम पाऊस  एक दीड तास सुरू होता.  त्यामुळे लक्ष्मीपूजनच साहित्य घेऊन रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना तसा फटका बसला काही वेळातच रस्ते ओस पडले.  केवळ विक्रेते रस्त्यावर राहिले त्यामुळे फुलांच्या भावातही घसरण झाली. 
रात्री साडेआठच्या सुमारास शहर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने  झोडपले वारे जोरदार वाहत होते काही क्षणातच जोरदार पावसात सुरुवात झाली त्यामुळे रस्ते जलमय झाले लक्ष्मीपूजन करून फटाकडे उडवण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले होते. त्यांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागला.


मुंबईतही व्यापाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करून भरभराटीसाठी प्रार्थना केली तसेच घरोघरी पूजा करण्यात आली.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारीच अचानक  पाऊस सुरू झाल्याने खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.  गृहसंकुलात लावलेल्या आकाश कंदील बच्चेकंपनीने बनविलेले किल्ले भिजले.  सकाळपासून वातावरणात उत्साह होता पावसाची शक्यता नव्हती त्यामुळे सर्वत्र जल्लोष होता.मात्र ,अचानक झालेल्या पावसाने बाजारपेठांमध्ये शांतता पसरली सायंकाळी उशिरा पाऊस सुरू झाला.  नागरिकांनी फटाक्यांचे आतषबाजी केली मात्र रस्त्यावर पाणी असल्याने फटाक्यांचा जोर कमीच होता. पाऊस असला तरी मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साथीने चाळीत व इमारतीत दीपोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम स्पर्धा ही रंगल्या एकूणच मुंबई,ठाणे ,नगर शहर व परिसराला वादळी वाऱ्यास जोरदार पावसाने झोडपून काढले.  अकोलेतालुक्यात ही पावसाने दुपारनंतर व पुन्हा रात्री हजेरी लावली पावसाने लक्ष्मीपूजनासाठी सजलेल्या बाजारपेठेच्या उत्साहावर पाणी फिरले 

Post a Comment

0 Comments