मनपा कर्मचाऱ्यांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा - माजी उपमहापौर गणेश भोसले
मनपा कर्मचाऱ्यांसमवेत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी साजरी केली दिवाळी
नगर : महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आपल्या प्रभागातील मनपा कर्मचाऱ्यांसमवेत दिवाळी सण साजरा केला. या प्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांना मिठाई वाटून सणाचा आनंद व्यक्त केला. भोसले म्हणाले, मनपा कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे खरे दूत आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत आरोग्य, स्वच्छता, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी तातडीच्या सेवा देत ते नागरिकांच्या सेवेत तत्पर असतात.

ऊन, पाऊस, वा वारा असो,हे कर्मचारी आपली काळजी न करता नगरकरांच्या सोयीसाठी काम करतात. आपल्या सण-उत्सवाच्या काळात नागरिकांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जे कर्मचारी मनापासून काम करतात, त्यांचे योगदान अमूल्य आहे. माझ्या प्रभागातील कर्मचाऱ्यांनी नेहमीच नागरिकांशी आपुलकीचे, स्नेहपूर्ण आणि ऋणानुबंधाचे संबंध ठेवले आहेत.
यावर्षीचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून किरण जोदीया यांना पुरस्काराने सन्मानित करत ५००० रुपयांचे रोख पारितोषिक दिले. दिवाळीच्या या निमित्ताने प्रभागातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या परिश्रमाचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कौतुक केले.
.jpg)

0 Comments