देव दिवाळीनिमित्त दि. 15 रोजी नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई
नगर- नवीपेठ, अहिल्यानगर येथील श्रीराम मंदिरात देव दिवाळीनिमित्त दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून या देव दिवाळीनिमित्त 1111 दीप प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.
नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात .
दर शनिवारी भक्तिभावाने हनुमान चालीसा पठाण व भजन संध्या आयोजित करण्यात येत आहे गेल्या 17 वर्षापासून अविरतपणे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक धार्मिक उत्सव या मंदिरामध्ये साजरा होत आहेत.
देव दिवाळीनिमित्त श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच दिनांक 15 रोजी 1111 दीप प्रज्वलित करून आकर्षक सजावट करण्यात येणार आहे तरी या उत्सवात नगर शहरातील भावीक भक्तांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आव्हान श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments