वांबोरी चारी टप्पा दोनच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले : राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी तिसगाव परिसरातील गाव भेट देत नागरिकांशी संवाद साधला
नगर : पाथर्डी हा जिराईत तालुका असून पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरे जावे लागते शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न व दूध धंदा, शेती सिंचनाखाली आणण्यासाठी वांबोरी चारी टप्पा एक व दोन मार्गी लागावा त्यासाठी प्रयत्न केले. आता लवकरच टप्पा दोन चे काम सुरू होणार असून पाथर्डी तालुक्यातील तलाव भरण्याचे काम होणार आहे. वांबुरी टप्पा दोन पाथर्डी तालुक्यातील गावांसाठी वरदान ठरणार आहे. विकासाची कामे कोणी केली हे जनता ठरवणार आहे, या विधानसभा निवडणुकीमध्ये मी राहुरी तालुक्यातूनच मताचे लीड घेऊन येणार आहे, तरी पाथर्डी तालुक्यातील जनतेने विकास कामांना मतदान करावे ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे यांचे गावाबद्दल असलेली अस्मिता आणि गावच्या विकासासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. तिसगाव परिसरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे, मी नेहमीच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी तिसगाव परिसरातील गाव भेट देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी जेष्ठ नेते काशिनाथ लवांडे, माजी सभापती संभाजी पालवे, अमोल आगासी, धोंडीभाऊ हजारे, महादेव नजन, शिवाजी सागर, अशोक घाडगे, प्रशांत अकोलकर, रमेश शिंदे, राजेंद्र अकोलकर, शहाजी पाठक, बंडू पाठक, अनिल गीते, विनायक पाठक, रावसाहेब वांडेकर, अरुण रायकर, कुशल भापसे, कानिफनाथ पाठक, सतीश पालवे, अक्षय पालवे, अमोल सातपुते, सुनील उमाप, माधव लोखंडे, अंबादास शिंदे, शरद खंडागळे, भाऊसाहेब शेलार, सुरेश शिरसाट, काकासाहेब शिंदे, भरत गारुडकर, अदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिसगाव ला मोठी बाजारपेठ लाभली असून या परिसरातील 25 गावे जोडले आहे या गावाला गावपण देण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याबरोबर राहण्याचे काम आपल्याला करायचे आहे, गरिबांच्या व्यथा समजून घेणारे नेतृत्व नगर जिल्ह्याला लाभले असून त्यांच्या भोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत आहे, माजी मंत्री तनपुरे यांच्याकडे काम करण्याची कुवत नाही मी गेली १० वर्ष तनपुरेंबरोबर राहिलो मात्र त्यांनी कधीही फोन उचलला नाही, मी आजारी असताना साधे ढुंकूनही पाहिले नाही मात्र ज्याच्या विरोधात मी काम केले ते मला दोनदा भेटायला आले, तिसगाव परिसरातील आंबेडकर चळवळीतील नागरिकांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा दिला आहे. या परिसरातून मोठे मताधिक्य दिले जाईल, शिवाजीराव कर्डिले हे संघर्षशील नेतृत्व असून गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावत असतात, असे मत ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे पाटील यांनी केले.
खंडोबा वाडीचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होता महिलांना पायपीट करीत डोक्यावर हड्याने पाणी आणावे लागत होते, मात्र शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावला ही निवडणूक कर्डिले यांची नसून जनतेची आहे, विरोधात ५ वर्षे कुठे असतात, निवडणूक आली की भूछत्र्यासारखे येतात, निम्म्या रात्री अडचणीच्या काळात आम्हाला देव आठवत नाही परंतु कर्डिले आठवतात. आम्ही केव्हाही त्यांना फोन लावतो आणि प्रश्न मार्गी लावून घेतो अशी भावना बंडू पाठक यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी चारी टप्पा दोन च्या कामासाठी मोठ्या निधी मंजूर करून आणला असल्यामुळे आमच्या भागातील तलाव भरणार आहे आणि शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे करंजी परिसरामध्ये मिनी एमआयडीसी उभी करावी जेणेकरून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे जाण्यासाठी कुठल्याही नागरिकाला मध्यस्थीची गरज लागत नाही, असे मत माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी केले.
0 Comments