ज्येष्ठ नागरिकांसाठी दि.१५ रोज़ी मोफ़त श्रवणदोष तपासणी शिबिर
नगर- रोटरी ई क्लब ऑफ़ एम्पॉवरीइंग युथ तर्फ़े गायत्री मंदिर चतुर्वेद भवन , महाजन गल्ली येथे दि. १५ नोहेबर २०२४ रोज़ी स. ९ ते संध्या. ६ पर्यन्त , ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफ़त श्रवणदोष तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी नगर मधील श्रवणयंत्रा साठी नामांकित, अग्रगण्य व प्रसिद्ध असे स्वामी हिअरींग एड सेंटर चे संचालक तेजस स्वामी आणि त्यांचे सहकारी मदत करणार आहेत .
या शिबिरा मध्ये मोफ़त श्रवणदोष तपासणी , प्रोग्रामिंग व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याच प्रमाणे सर्व शिबिरार्थी चे श्रवण यंत्र संदर्भातील शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.
ज्यांना ऐकण्याची समस्या आहे, समोरच्याला मोठ्यानी अथवा वारंवार बोलायला लावणे, टी व्ही मोठ्या आवाजात ऐकणे , हाक ऐकु न येणे , फ़ोन ची अथवा दरवाज्या ची बेल ऐकु न येणे , गोंधळात स्पष्ट ऐकु न येणे ज्यांना अशा प्रकारची लक्षणे असतील अथवा श्रवणयंत्र वापरन्या बाबत कोणती शंका असेल , त्यांनी नक्की या शिबिराचा लाभ घ्यावा.
असे आवाहन रोटरी ई क्लब तर्फ़े क्लब चे अध्यक्ष स्विटी पंजाबी ,सचिव डॉक्टर बिंदू शिरसाठ आणि ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विजया नीसळ यांनी केले आहे.
तरी ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा. अधिक माहिती व नाव नोंदनी साठी संपर्क - मो . ९९६०२१२८४८ . शिबिरा साठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
0 Comments