भिंगार शहराच्या विकासासाठी कायम कटीबद्ध - आ. संग्राम जगताप

 हर दिन मॉर्निंग ग्रुप च्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा

भिंगार शहराच्या विकासासाठी कायम कटीबद्ध - आ. संग्राम जगताप

गौतम बुद्ध जॉगिंग ट्रॅक भिंगार येथे आमदार संग्राम जगताप यांची भेट

नगर : हर दिन मॉर्निंग ग्रुप सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या दिवसाची सुरुवात करत आहे. या माध्यमातून चांगल्या कामाची ऊर्जा मिळत असते आणि आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते. भिंगार शहरांमध्ये मी केलेल्या विकास कामामुळे नागरिक मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहे. विकास कामातून भिंगार शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले जाईल. हर दिन मॉर्निंग ग्रुप वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित युवकांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे. चांगल्या विचारांचे लोक एकत्र आल्यानंतर चांगले काम उभे राहत असते. आपण सर्वजण मिळून भिंगार शहराचा विकास कामातून कायापालट करू.

 भिंगार शहराचे विविध प्रश्न सोडवीत असताना अडचणींना सामोरे जावे लागते. छावणी परिषद असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी अडचण निर्माण होते. मात्र त्या अडचणीवर मात करीत भिंगार शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. हर दिन मॉर्निंग ग्रुप आपल्या सदस्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षाची लागवड करून समाजामध्ये वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याचे काम केले जाते. वृक्ष संवर्धन हे मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

            गौतम बुद्ध जॉगिंग ट्रॅक भिंगार येथे आमदार संग्राम जगताप यांनी हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांची भेट घेत विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, सीए रवींद्र कटारिया, उद्योजक लॉरेन्स स्वामी, संजय चोपडा, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, सुमेश केदारे, अभिजीत सपकाळ, दिलीप गुगळे, दीपक घाडगे,  मनोहर दरवडे, अशोक पठारे, संजय भिंगारदिवे, सुधीर कपाले, विकास भिंगारदिवे, दीपक बडदे, सुभाष पेंढारकर, प्रकाश देवळालीकर, विठ्ठल राहिंज, मुन्ना वागस्कर, जियान सय्यद, चुनीलाल झंवर, अविनाश जाधव, शशांक अंबावडे, अनिल सोळसे, सरदार सिंग परदेशी, विलास आहेर, संपत बेरड, अनंत सदलापूरकर, संतोष आहेर, दिनेश शहापूरकर, राजू शेख आदींसह सभासद सदस्य उपस्थित होते.

भिंगार शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट, सभामंडपाची कामे मार्गी लागत आहेत. एवढा मोठा निधी भिंगार शहराच्या विकासासाठी कधीही मिळाला नव्हता. 

हर दिन मॉर्निंग ग्रुप वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षरोपण करत असतो. सभासद दररोज सकाळी गौतम बुद्ध जॉगिंग ट्रॅक येथे एकत्रित येत आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम व योग साधना करत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्य सुदृढ निरोगी राहण्यास मदत होते अशी माहिती हर दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी दिली.

Post a Comment

0 Comments