सावेडी गावठाण येथे आ. संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेचे जल्लोषात स्वागत
भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले की, शहरामध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यांनी शासनाच्या माध्यमातून विकास कामांची गंगाच आणली आहे याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांनी देखील शहर विकासासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून दिला. महायुती सरकारने राज्यात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले असल्यामुळे महायुतीचे सरकार येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविले आहेत असे ते म्हणाले
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की , नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित झाला असून भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराला लागले आहे असून घरोघरी जाऊन महायुतीने केलेल्या विकास कामाची माहिती दिली जात आहे असे ते म्हणाले
नगर शहर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची माहिती देत आहे, आम्ही सर्वजण बरोबर असून शहर विकासाला गती दिली आहे, पुढच्या काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करू असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
0 Comments