नामस्मरणाने देवत्वाची प्राप्ती होते-ह.भ.प.अनुराधाताई
नगर - मानवी जीवन एक पर्वणी असून या पर्वणीत आपण निरपेक्ष भावाने सतत भगवंताचं नामस्मरण केल्यास देवत्वाची प्राप्ती होते असे प्रतिपादन ह.भ.प. अनुराधाताई महाराज यांनी केले.
तीसगाव येथील संत सावता महाराज मंदिर येथे दरमहा वद्य एकादशी प्रवचन महोत्सव मालिकेतील प्रवचनरुपी सेवेत मने वाचा करणी या ओवीद्वारे निरुपण करतांना त्यांनी रामायण,महाभारत यातील प्रसंगासह स्वयंभू मनु-शतरुपा आख्यानातून मनु राजांच्या भगवद्भक्तीचा योगमार्ग ज्ञानोबारायांचा ज्ञानमार्ग सावतोबांचा कर्ममार्ग अन तुकोबारायांचा भक्तीमार्ग यातून त्यांची भगवंताशी झालेली भेट अन प्राप्त झालेलं देवत्व याचं मुळ हे नामस्मरण हेच असल्याचं सांगत अनेक दृष्टांताद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
मोफत कीर्तन-प्रवचन सेवा... पैसे तर सोडा साध श्रीफळ ही नम्रपणे नाकारत भागीरथीबाबा व अनुराधाताई हे दाम्पत्य समाजकार्यासोबत मोफत कीर्तन-प्रवचन सेवेतून समाज प्रबोधनाचं कार्य मोठ्या उदार भावनेनं करत आहेत.
त्यांची ही निरपेक्ष सेवा परमार्थाचा व्यवहार अन बाजार करु पाहणार्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असल्याची प्रतिक्रिया भाविकातून येत आहे.यावेळी दशरथ आण्णा पाठक डॉक्टर ससाणे एकनाथ उगले नंदू लोखंडे याच्यासह भाविक उपस्थित होते.
0 Comments