सीसीटीव्ही कॅमेरा मुळे गुन्हेगारीला आळा बसेल
सिताराम पालवे - निर्मलनगरला भगवान बाबा मंदिरातील कॅमेरा बसविण्याचा शुभारंभ
नगर- वाढती लोकसंख्या, वाढणारी बेरोजगारी यामुळे तरुण वर्ग नाईलाजाने गुन्हेगारी कडे वळताना दिसत आहे. दुचाकी चोर, चैन स्केचिंग, मंदिरांमधील दानपेट्या चोरी यामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. निर्मल नगर येथील भगवान बाबा मंदिर, हनुमान मंदिरात दिवसा चोर्या झाल्या. यामधे पितळी घंटा, दिव्याच्या समई, दानपेटी चोर्याचे प्रमाण वाढले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या करिता पुढाकार घेतला. यामुळे भविष्यात होणार्या चोर्या बंद होतील. या भावनेने कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. सीसीटीव्ही मुळे चोर पकडण्यासाठी पोलिसांना चांगली मदत होते. या सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक सिताराम पालवे यांनी केले.
सावेडी उपनगरात निर्मल नगर येथे भगवान बाबा मंदिरात सामाजिक कार्यकर्तेव भगवान बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.भीमराज आव्हाड, राहुल सांगळे, भाऊसाहेब जावळे या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला त्याचा शुभारंभ सिताराम पालवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अनिल आंधळे, नामदेव कांबळे, गोकुळ काळे, विठ्ठल खेडकर,संभाजी आव्हाड, प्रकाश लगड, अंबादास दहिफळे, कचरू आंधळे, संजय शिरसाठ,पप्पू गीते, संदीप ढाकणे, मोहन आव्हाड, विष्णू सुपेकर, अण्णा शिरसाठ,रमेश गायकवाड, लक्ष्मण दहिफळे, जगन्नाथ जावळे, बापू कांबळे, ज्ञानदेव चेमटे, बापू भावसार परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भगवान बाबा व हनुमान मंदिर मधील मोठमोठ्या समई, पितळी घंटा, दानपेट्या आदींच्या चोर्या वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांसह भाविकांनी याबाबत चिंता व्यक्त केली. जर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर चोर्या होणार नाहीत या उद्देशाने मागणी केली. त्याची त्वरित दखल घेऊन मी व माझे सहकारी श्री.राहुल सांगळे श्री.भाऊसाहेब जावळे आम्ही तिघांनी लगेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला व त्याचा शुभारंभ जेष्ठ नागरिकांच्या हस्ते केला. आता यामुळे तरी चोर्यांचे सत्र कमी होईल.2दिवसात हे सर्व काम पूर्ण होईल.असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. भीमराज आव्हाड यांनी सांगितले.
0 Comments