माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे मंगळवारी राहुरीत मोठे शक्तिप्रदर्शन
बड्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार
राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचाराला वेग दिला आहे. कर्डिले यांनी मंगळवार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी राहुरी येथे मोठे शक्तिप्रदर्शन करीत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून कर्डिले अर्ज दाखल करणार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. राहुरी मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गावनिहाय भेटी देत कर्डिले मतदारांशी संवाद साधत आहेत. या प्रचारा दरम्यान त्यांना मोठे समर्थन मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्येक गावात होणारे उत्स्फूर्त स्वागत आणि स्थानिक पदाधिकारी, मतदारांकडून व्यक्त होणाऱ्या भावना पाहता यंदा परिवर्तन अटळ असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.
कर्डिले यांनी सलग दहा वर्षे राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यावेळी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा ते सादर करीत आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्यांनी राहुरी तालुक्यात जनसंपर्क कायम ठेवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अनेक विकासकामे मार्गी लावली. नवीन रोहित्रांसाठी विशेष प्रयत्न करून निधी आणत वीजेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मोठे योगदान दिले. याशिवाय जनता दरबार घेवून तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर कर्डिले यांच्या प्रचारात उत्साह निर्माण झाला आहे.
राहुरी तालुक्यातील गावांमध्ये आमदार नसताना केलेली विकासकामे सादर करतानाच विद्यमान लोकप्रतिनिधीची निष्क्रियता कर्डिलेंनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय महायुती सरकारच्या लाडक्या बहिणींपासून लाडक्या भावांसाठीच्या कल्याणकारी योजना समोर ठेवून ते मतदारांना साकडे घालत आहेत. राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी तसेच पदाधिकारी, कार्यकत्य्रांनी भाजपमध्ये प्रवेश करून कर्डिलेंना पाठिंबा दिला आहे. याशिवाय भाजप नेते सत्यजित कदम यांनीही एकदिलाने कर्डिले यांनाच साथ देण्याचे जाहीर केल्याने राहुरी तालुक्यात कर्डिलेंचा जोर वाढला आहे.
0 Comments