सर्वसामान्यांसाठी सवलतीच्या दरात दिवाळी फराळ

 सर्वसामान्यांसाठी सवलतीच्या दरात दिवाळी फराळ

 मा. महापौर बाबासाहेब वाकळे : संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम;सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी हा उद्देश

नगर : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सर्वोच्च सण म्हणून साजरा केला जातो. समाजातील सर्व घटक हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने दिवाळी फराळ फक्त शंभर रुपये किलो या दराने उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

    या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच वाकळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. सवलत दरातील फराळामध्ये लाडू, चकली, शेव, शंकरपाळे, चिवडा, आदी पदार्थ एक किलो च्या पॅकिंग मध्ये फक्त शंभर रुपये या दराने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

समाजातील अंध अपंग अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी साठी मोफत फराळाचे वाटप करण्यात येत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक बांधिलकीतून तसेच वंचित घटकांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे यावेळी बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. 



Post a Comment

0 Comments