आ. संग्राम जगतापना उमेदवारी देवून अजित दादांनी त्यांच्या कामाची पावती दिली
भिमराज आव्हाड - भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष
नगर- गेल्या 30 वर्षात नगर शहराचा जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास दहा वर्षात करून शहराचे विकासाचे व्हिजन दाखवून दिले त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी जाहीर करून अजित दादांनी त्यांच्या कामाची पावती दिली अशी भावना भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष भीमराज आव्हाड यांनी व्यक्त केली.
निर्मल नगर येथे भगवान बाबा चौकात ट्रस्टच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी श्री आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सावेडी उपनगर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष व आ.संग्राम जगताप यांचे एकनिष्ठ खंदे समर्थक राहुल सांगळे, जॉय लोखंडे, सिताराम पालवे, संजय सानप, लक्ष्मण दहिफळे, संदीप ढाकणे, नाना पंडित, बाळासाहेब कांबळे,गोविंद नरवडे, जगन्नाथ डोंगरे, अशोक सारूक, भानुदास गीते, राजेंद्र पालवे, लक्ष्मण शेळके, दिनेश जरे, आनंद नाकाडे, जावेद इनामदार, अभिषेक हरबा, महेश घुले, वैभव कांबळे, कृष्णा शिरसाठ, रोहित रोकडे, सचिन जरे, अनिकेत वाघ, यश भिंगारदिवे, पप्पू पोटे, अकिब शेख आदींसह नागरिक उपस्थित होते.
श्री आव्हाड म्हणाले की, शहर विकासाचा रथ आमदार जगताप यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेला रस्ते, पाणी प्रश्न यांना प्राधान्य दिले त्यांच्या नियोजनबद्ध विकास कामांमुळे नगरकर त्यांच्या पाठीशी आहेत. उमेदवारी जाहीर होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले यावेळी पन्नास ते साठ हजार मताधिक्याने ते विजयी होतील असे त्यांनी सांगितले.
राहुल सांगळे म्हणाले की आमदार जगताप यांनी विकास कामांना प्राधान्य दिले. राजकारण न करता सर्वांना समान निधी प्रभागात दिला शहर, उपनगर, परिसरातील प्रश्न सोडविले ते विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी संग्राम जगताप यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
0 Comments