शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वातकमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी - आबीद खान

 शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वातकमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी - आबीद खान

नगर - नवीन पिढीला काहीही ना करता फुकटमध्ये स्वातंत्र्य मिळाले म्हणून त्यांना देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीर व शहीदांविषयी फार आकर्षण राहिलेले नाही व आज शाळेमध्ये जो थोडाफार इतिहास शिकविली जातो, त्यामुळे त्यांना थोडेफार प्रचलित मोठे स्वतंत्र्य सेनानी आठवतात. घरातल्या मोठ्यांकडून त्यांना कधीच स्वतंत्र्य सेनानींबद्दल सांगितले जात नाही, म्हणून आजची युवा पिढी शहिदांना विसरत चालली आहे. शहिदांच्या जयंती-पुण्यतिथी साजरी केल्याने कमीत कमी त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलदानाची आठवण होते. शहीद अशफाकुल्ला खान फासावर जाणारे सर्वात कमी वयाचे स्वातंत्र्य सेनानी होते, असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले.

मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने स्वतंत्रता सेनानी शहीद अशफाकुल्ला खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उर्दू शाळा आलमगीर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व विधार्थांना एफ. एन. ब्रदर्स च्यावतीने मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका शेख जाकेरा नासीर, शेख नसरीन बानो ज़हुरूददीन, शेख शगूफता अंजुम अ. समद, सय्यद साजिरा असगर .सय्यद रफअत हूसेन,शेख शिरीन पिर महोम्मद आदी उपस्थित होते.

प्रास्तविकात मुख्याध्यापिका जाकेरा शेख यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात येणार्‍या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शगूफता यांनी केले. तर आभार शेख नसरीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उर्दू शाळा आलमगीर च्या सर्व शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments