अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित

 अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य सुनिल पंडित 

 कार्याध्यक्षपदी राजेंद्र सोनवणे व सरचिटणीस म्हणून मिथुन डोंगरे यांची बिनविरोध निवड       

         नगर-  अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची जिल्हा कार्यकारणी व सर्वसाधारण सभा मातोश्री रु .दा .मालपाणी विद्यालय संगमनेर येथे अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी संघाचे माजी सरचिटणीस शांताराम डोंगरे उपस्थित होते. सदर सभेत पुढील पाच वर्षासाठी खालील प्रमाणे सर्वांनुमते जिल्हा कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.

     अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित नगर यांची फेर निवड करण्यात आली तर कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे (अकोले), सरचिटणीस मिथुन डोंगरे (पाथर्डी), संघटन मंत्री सचिव संजय लहारे (संगमनेर) कार्यालय मंत्री मंगेश जाधव (पारनेर), खजिनदार  एम .जी .राऊत (पारनेर) उपाध्यक्ष  राजेंद्र वाघ (पारनेर),  आबासाहेब गडदे (आबा ) (राहुरी), बाळासाहेब सूर्यवंशी ( जंगले) . (श्रीगोंदा), बाळासाहेब वाघ (कर्जत), प्रकाश देशमुख (कोपरगाव), बालाजी गायकवाड (शेवगाव),  आबासाहेब गडदे (राहुरी), सहसचिव  उद्धव सोनवणे (नेवासा), एस .बी . उकिर्डे (अकोले), 


एस .एस .पवार (नगर तालुका), आर .एस .औताडे (श्रीरामपूर), निरंजन डांगे . राहता, शेख जमीर .नगर तालुका, विद्या सचिव सुनिल धुमाळ(अकोले),  सहविद्या सचिव  श्रीकृष्ण पवार (नगर), हिशोब तपासणी  सौ . संगीता म्हस्के( संगमनेर),.महिला आघाडी प्रमुख -सौ. संगीता हासे (अकोले), उपाध्यक्षा  ज्योस्ना शिंदे (नगर), सचिव डॉ.सुनिता पारे (कोपरगाव), इंग्रजी माध्यम प्रमुख  गीता तांबे(नगर), रात्र शाळा प्रमुख  सुनिल सुसरे(नगर),  राज्य कार्यकारणी सदस्य दशरथ कोपनर (अकोले)  सौ.  शितल बांगर (नगर)  सुनिल भोर (श्रीगोंदा), पुणे विभागीय सदस्य निवृत्ती इले (राहुरी)  अशोक दौड ( पाथर्डी),  संपादक  भाऊसाहेब रोहकले (नगर तालुका) प्रमुख तज्ञ मार्गदर्शक  प्राचार्य विजय पोकळे , उल्हास  दुगड, प्रमोद तोरणे (भिंगार कॅन्टोन्मेंट),  यशवंत भुतकर, कैलास काकडे, मार्गदर्शक- शांताराम डोंगरे, कळसकर , बापूसाहेब काळदाते, आनंता खेत्रे, श्री बी टी गमे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब वाकचौरे,दत्ता भांडवलकर,सौ. लता डांगे, अभिमन्यू चव्हाण, बा .ल. ठोकळ आदींचे बिनविरोध निवड करण्यात आली.

                या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे जिल्हाध्यक्ष व राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. .उपस्थित सर्वांचे आभार सरचिटणीस मिथुन डोंगरे यांनी मानले.  या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments