अहिल्यानगर विकास मंचची स्थापना..

 अहिल्यानगर विकास मंचची स्थापना..


शाश्वत विकास व्हावा यासाठी आर्किटेक्टस् इंजिनिअअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनचा पुढाकार 

नगर : अहिल्यानगरचा शाश्वत विकास व्हावा यासाठी आर्किटेक्टस् इंजिनिअअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन मधील सभासद तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन मंगळवार 15 -10 -2024 रोजी JLP टॉवर्स लिंक रोड केडगाव येथे बैठक घेऊन सदर फोरम ची स्थापना केली. 

       सदर मंच मार्फत शहरातील विकास कामांची तपासणी करून त्याचे अहवाल न्यूज पेपरला प्रसिद्ध करणे तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे याद्वारे विकास कामे चांगले होण्यासाठी प्रयत्न करणे. नवीन होऊ घातलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन चा अभ्यास करून त्यात आवश्यकतेनुसार बदल सुचवणे. नगर शहराशी इतर शहरांची कनेक्टिव्हिटी चा अभ्यास करून प्रोजेक्ट रिपोर्ट शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी यांना सादर करून त्याचा पाठपुरावा करणे. शहराच्या पर्यटन वाढीसाठी उपाय सुचवणे व ते शासकीय अथवा लोकप्रतिनिधींकडे सादर करून शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणे. शहरवासीयांच्या आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजनांचा अभ्यास करून त्या शासकीय व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सादर करून पाठपुरावा करणे.

सीना नदी विकास प्रकल्पाचा अभ्यास करून डेव्हलपमेंट सादर करणे व त्याचा पाठपुरावा करणे. पालिकेच्या पिंपळगाव माळवी येथील तलाव व शासकीय जागेत पर्यटन क्षेत्र तयार करण्यासाठी अभ्यास पूर्वक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करून त्याच्या पाठपुरावा करणे. शहरातच असलेल्या भुईकोट किल्ल्याचा विकास व पर्यटन वाढीसाठी चालना देणे.

शहरातील इंडस्ट्रीची वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे. शहरात एज्युकेशन हब तसेच मेडिकल कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करणे. हॉकर्स झोनचे कायदे अभ्यासून त्यात सुधारणा करणे व त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास भाग पाडणे. रस्त्यांची दुरावस्था तसेच रस्त्यातील पार्किंग, इमारती अतिक्रमण, विक्रेता अतिक्रमण हे प्रशासनाच्या नजरेस आणून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडणे. शहरात चालू असलेल्या विकास कामांचे ऑडिट करून तसेच ते संबंधित लोकप्रतिनिधी यांना भेटून पाठपुरावा करणे. मीटिंगमध्ये वरील प्रमाणे ठराव  सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

         संबंधित मंच हा आर्किटेक्टस् इंजिनिअर्स व सर्व्हेअर्स असोसिएशनचा एक उपक्रम असून त्यात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी, उद्योजक यांना विशेष निमंत्रित म्हणून जोडले जाईल असे मंचाचे आमंत्रक श्री. विजयकुमार पादीर यांनी सांगितले.

       सभेस एसाचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे, संजय पवार, प्रदिप तांदळे, मधुकर बालटे,  प्रकाश जैन, भालचंद्र सोनवणे, प्रताप काळे, जालिंदर पालवे, अन्वर शेख, संतोष खांडेकर, सचिन डागा, रियाज शेख, शेखर आंधळे, आदित्य पालवे, संकेत पादीर व  इतर मान्यवर नगरप्रेमी उपस्थित होते.

      अतिशय सकारात्मक प्रतिसाद या मंचास मिळत असून यात राजकारण व जातीधर्म विरहित शहराच्या विकासासाठी योगदान देऊ इच्छिणारे नगरकर सामील होऊ शकतात असे आवाहन करण्यात आले. यासाठी इच्छुक नगरवासियांनी मंचाचे संस्थापक संयोजक श्री विजयकुमार पादीर मोबा. - 9422225665  यांना संपर्क करावा. पुढील मीटिंग दिवाळीनंतर लगेचच घेण्यात येईल व त्यात पुढील दिशा ठरवण्यात येईल असे पादीर यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments