सावेडी जेष्ठ नागरिक मंचच्या वतीने भव्य नेत्र तपासणी शिबीर
जागतिक अंध दिनानिमित्त तपासणी
नगर - समदृष्टी समता विकास एवम् अनुसंधान मंडळ अर्थात सक्षम तर्फे भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजिन करण्यात आले. या संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र चिटगोपेकर व त्यांचे सहकारी यांनी मंचच्या सभासदांची व जेष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली.
यावेळी सक्षम संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर बापट म्हणाले की, संस्थेची स्थापना 2008 मध्ये झाली. जवळपास 43 प्रांतांमध्ये हि संस्था कार्यरत असून 21 प्रकारच्या दिव्यांगांसाठी हि संस्था काम करते. शहरातील विविध शाळेत तसेच दिव्यांग शाळेत संस्थेतर्फे नेत्र तपासणी केली जाते तसेच नगर जिल्ह्यामध्ये भारती कुलकर्णी, वर्षा रोडे, संध्या कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, रामचंद्र जागीरदार कार्यरत आहेत.
जेष्ठ नागरीक मंच करमणुकीचे कार्यक्रम, व्याख्याने, शिबीरे दर महिन्याला आयोजित करत असते, असे मंचचे शरद कुलकर्णी म्हणाले.
यावेळी मंचाचे शरद कुलकर्णी, मोरेश्वर मुळे, बाजीराव जाधव, सुरेश कुलकर्णी, शोभा ढेपे, स्नेहल वेलणकर, पुष्पा चिंताबर आदी उपस्थित होते.
यावेळी मंचातर्फे सभासदांचे वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बाजीराव जाधव यांनी केले.
0 Comments