शिक्षकांचे ऑक्टोंबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करावे
सुनिल गाडगे : शिक्षक भारतीची मागणी
नगर - दिवाळीचा सण 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत असल्याने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिनांक 25 ऑक्टोंबर पूर्वी अदा करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते व तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
यावेळी सुनिल गाडगे म्हणाले की, दिवाळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा करण्यात येतो. हा सण प्रत्येक जण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. दिवाळी हा सण खर्चिक असल्यामुळे या सणासाठी मोठी आर्थिक गरज असते. सध्या महागाईच्या काळात इतर अनेक खर्चांमुळे प्रत्येकाचीच आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे. अशातच शिक्षकांचे पगार दिवाळीनंतर झाले तर शिक्षकांनी दिवाळी साजरी कशी करायची, शिक्षकांना ही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांचे वेतन दिवाळीपुर्वी व्हावे,या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी दिवाळीपुर्वी शिक्षकांचे वेतन देण्यात यावे यासाठी शिक्षक नेते तथा शिक्षक भरतीचे राज्य सचिव सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, कैलास जाधव, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, सोमनाथ बोंतले, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या राज्यअध्यक्षा रूपाली कुरूमकर आदीं मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहे.
0 Comments