'बहार' दिवाळी फेस्टचे आयोजन
नगर : दीपावली म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण. आप्त , मित्र ,परिवाराने एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव . या सणानिमित्त खरेदी- विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणात होते.
आज बरेच छोटे व्यावसायिक नवनवीन वस्तू ,उत्पादने ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत . या सर्वांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून ब्लू जेम फाउंडेशनने याही वर्षी 'बहार' दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे आयोजन केले आहे.
25 व 26 ऑक्टोबर 2024 या दोन दिवशी या शॉपिंग महोत्सवाचे आयोजन रावसाहेब पटवर्धन स्मारक ,प्रोफेसर चौक, सावेडी येथे केले आहे . ज्या व्यावसायिकांना या महोत्सवात स्टॉल लावायचे असतील त्यांनी 98 200 ते 20 73 किंवा 98 28 63 222 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपला सहभाग निश्चित करावा.
ब्लू जेम फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिला व्यावसायिकांना बाजारपेठ मिळावी व व्यवसाय वाढवता यावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते, असे फाउंडेशनच्या अध्यक्ष निलम परदेशी यांनी सांगितले.
सर्व नगरकरांनी या दोन दिवसीय महोत्सवाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा. या महोत्सवात खरेदी करणाऱ्या ग्राहकांमधून दोन्ही दिवस लकी ड्रॉ काढून बक्षीसं देण्यात येणार आहेत. तसेच महिलांकरिता मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येणार असल्याचे ब्ल्यू जेमच्या सहसचिव लाजरी परदेशी- जोशी यांनी सांगितले.
0 Comments