डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत स्वच्छता अभियान
प्राचार्य डॉ.उदय नाईक : संत गाडगेबाबा यांचा जीवनाचा आदर्श घेवून स्वच्छतेविषयी प्रत्येकाने जागरुक झाले पाहिजे
नगर - स्वच्छ परिसर, सुंदर परिसर या उक्तीनुसार स्वच्छतेने आरोग्यामध्ये होणारे सकारात्मक बदल व त्यातून मिळणार्या उत्साहातू आपल्यामध्ये आमुलाग्र बदल घडून येते. रोज आपले घरच नाहीतर कामाचे ठिकाण, क्रीडांगण, आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. इतरांनाही स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. श्री संत गाडगेबाबा यांचा जीवनाचा आदर्श घेवून स्वच्छतेविषयी प्रत्येकाने जागरुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी केल.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान दिन साजरा करण्यात आला. भारत सरकारने 2014 साली सुरु केलेल्या स्वच्छता सप्ताहा अंतर्गत स्वच्छता अभियान 2024 हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना शिक्षक समन्वयक प्रा. मंदार बिडवे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियान कसे राबवावे तसेच स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करुन स्वच्छतेचा प्रसार कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
यावेळी वर्ल्ड एन्हार्नमेंटल हेल्थ डे 2024 ही साजरा करण्यात आला. त्यामध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माती कशी करता येईल यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, प्रदुषण नियंत्रण, निर्जंतुकीकरण आणि कचरा व्यवस्थापन याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मंदार बिडवे, राष्ट्रीय सेवा योजना शिक्षक समन्वयक, प्रा. सुनिल मांढरे, विद्यार्थी विकास मंडळ शिक्षक समन्वयक, प्रा. गणेश डहाणे, ग्रीन क्लब शिक्षक समन्वयक, डॉ. अनिकेत विखे, प्रा.एस.बी. जोशी, प्रा. दत्ता ठाणगे, प्रा. एस. के. शेख, प्रा. नाना मुळीक, प्रा. माधवी नेरकर तसेच प्रा. नितीन पोंधे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी टेक्निकल डेप्युटी डायरेक्टर सुनिल कल्हापुरे, प्रभारी सेक्रेटरी जनरल डॉ. पी.एम. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी डॉ. विखे पा. फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील आयोजकांचे कौतुक केले.
0 Comments