विरोधकांची पात्रता नसताना तसेच अर्धवट माहिती घेऊन टीका करणे हास्यास्पद
कर्डिले : जेऊर आरोग्य केंद्रासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
नगर : विरोधक पात्रता नसताना तसेच कामाबद्दल अर्धवट माहिती घेऊन टीका करत आहेत. आमदार नसताना देखील मतदार संघात विविध विकास कामे करण्यात आले आहेत. ना. राधाकृष्ण विखे, माजी खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून तसेच सरकारमार्फत विविध विकास कामांना निधी मिळवून मतदारसंघात विकासाच्या कामाला चालना दिली. मात्र विरोधक कामाच्या निधीबद्दल काहीही माहिती नसताना अर्धवट माहिती द्वारे टीका करतात हे हास्यस्पद असल्याचे माजी मंत्री तथा जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना कर्डिले यांनी सांगितले की सदर कामाला मंजुरी ही मी आमदार असताना तसेच सुजय विखे खासदार तर शालिनीताई विखे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मिळाली आहे. त्यामुळे सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी आरोग्य केंद्रासाठी देण्यात आला. त्यावरून विरोधक सदर निधी आम्हीच आणल्याचे सांगतात त्यांना अभ्यास अन् सत्य माहिती घेऊन बोलण्याचा सल्लाही कर्डिले यांनी दिला. यावेळी कर्डिले यांनी सदर कामाच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश उपस्थित नागरिकांना दाखविला.
विद्यमान आमदारांकडे मंत्रीपद होते तरी देखील त्यांना काही करता आले नाही. केवळ आश्वासने व स्वप्ने दाखवायचे काम त्यांनी केले. अडीच वर्षांची सत्ता असताना यांना विकास कामे करता आले नाहीत. त्यानंतर मात्र आपले सरकार स्थापन झाल्यानंतर विकास कामांची गंगा मतदारसंघात वाहु लागली. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात आला. माझ्याकडे २५ वर्षांपासून जनता दरबार सुरू असून पराभवानंतरही विकास कामे व नागरिकांच्या समस्या सोडवत आलो आहे. तुमच्या आशीर्वादाने खूप काही मिळाले आता अपेक्षा नाही. आगामी निवडणूक कार्यकर्ते व मतदारांच्या आग्रहाखातर लढवणार असून ही माझी शेवटची निवडणूक राहणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी नरगीर बाबा मंदिर परिसर सुशोभीकरण ,डोंगरगण रोड डांबरीकरण, वाघवाडी जगदाळे वस्ती रस्ता, म्हस्के वस्ती सिमेंट रस्ता व पेव्हींग ब्लॉक, गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, तसेच पेव्हींग ब्लॉक, वाघवाडी येथील शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तर आरोग्य केंद्र नूतन इमारत, ससे वस्ती रस्त्यावरील सीडी वर्क, गावांतर्गत स्ट्रीट लाईट, संतुकनाथ विद्यालयासमोर सीडी वर्क, जेऊर तोडमलवाडी रस्ता, जुनी नगर वाट रस्ता, वाघवाडी जगदाळे वस्ती रस्त्यावरील सीडी वर्क, अंगणवाडी वर्ग गावठाण, जिल्हा परिषद शाळा खोल्या दुरुस्ती, माळवाडी येथे ट्रांसफार्मर, वाघवाडी येथील ट्रांसफार्मर ,वाघवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, संभाजी नगर महामार्गावरील स्ट्रीट लाईट, दोन अंगणवाडी खोल्या, ईदगाह मैदान येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच ज्योती तोडमल, रभाजी सुळ मिनीनाथ दुसुंगे, मधुकर मगर, विकास कोथिंबीरे, सुनील पवार, धर्मनाथ आव्हाड, सुनील ससे, सोमनाथ हारेर, बाबा शेख, राजेंद्र ससे, बाळासाहेब वाघ, बापू तागड, गणेश आवारे, लक्ष्मण वीरकर, रघुनाथ महाराज तोडमल, अनिल पवार, दिनेश बेल्हेकर, बंडू पवार, आदिनाथ बनकर, बाबासाहेब तोडमल, राजू तोडमल, प्रितेश तोडमल, गणेश तवले, आप्पासाहेब बनकर, संजय दारकुंडे, सुदाम मगर, एकनाथ वाघ, साहेबराव वाघ यांच्यासह परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments