ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या आशीर्वादातून काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळते
माजी उपमहापौर गणेश भोसले : आ. संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
नगर : ज्येष्ठ नागरिक हे समाजातील एक महत्त्वाचा घटक असून त्यांना भवनाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे ज्येष्ठ नागरिकांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी वेचले आहे त्यातून नंदनवन निर्माण केले आहे आता त्यांना मनोरंजन, गप्पागोष्टी आणि आरामाची खरी गरज आहे, यासाठी आमदार संग्राम भैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने थोड्या गप्पा थोडी गाणी या माध्यमातून मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी गायिका सन्मिता शिंदे व व्याख्याते गणेश शिंदे यांनी गीतांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या भावनेला हात घालत मने जिंकण्याचे काम केले आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे समाजाप्रती सुरू असलेल्या कामास शुभेच्छा दिल्या, ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या आशीर्वादातून काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळते असे प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले
बडी साजन मंगल कार्यालय येथे आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे उद्घाटन केशव खानदेशे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, जेष्ठ नेते अंबादास पंधाडे, खान साहब, तात्या दरेकर, डॉक्टर विजयकुमार भंडारी, संजय चोपडा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, ह भ प प्रभाताई भोंग आदीसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यातील आलेल्या अनुभवाचा उपयोग व मार्गदर्शन कुटुंबातील युवा पिढीवर होत असतो आणि मिळालेल्या शिदोरीच्या माध्यमातून एक सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते ज्येष्ठ नागरिकांचे पुढील आयुष्य आनंदीमय जाण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे फाउंडेशनच्या माध्यमातून घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे व्याख्याते गणेश शिंदे व गायिका सन्मिता शिंदे यांनी गीतांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण केली असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम जगताप यांनी विकासाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या असून त्या पलीकडे जाऊन ज्येष्ठांचा आधार बनण्याचे काम त्यांनी केले आहे, आपलेपणाच्या भावनेतून समाज घटकातील ज्येष्ठांना बरोबर घेऊन स्नेहाचा संवाद साधत एकमेकांमध्ये ऋणानुबंध निर्माण केला असे मत आगरकर मळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव खानदेशे यांनी व्यक्त केले
0 Comments