पारिजात चौक येथे दसऱ्यानिमित्त 51 फुटी रावणाचे दहन

 पारिजात चौक येथे दसऱ्यानिमित्त 51 फुटी रावणाचे दहन


मा.नगरसेवक रामदास आंधळे  : रावण दहन म्हणजे सत्याचा विजय साजरा करण्याचा सुंदर,ऐतिहासिक क्षण 

नगर : सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती व परंपरेचे जतन होत असते गेल्या २० वर्षापासून गुलमोहर प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी फटाक्याची आतिषबाजी करत रावणाचे दहन केले जाते,  दसरा हा सण म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आणि धर्माचा अधर्मावर विजय. रावणाचे दहन हे प्रतिकात्मक आहे, जे आपल्याला अहंकार, वाईट प्रवृत्ती, आणि लोभ यांचा नाश करण्याचे शिकवते. भगवान राम हे धर्माचे, नीतीचे आणि सत्याचे प्रतीक आहेत, तर रावण हे वाईट विचार, अधर्म आणि अहंकाराचे प्रतीक आहे. रावण दहन हा विधी म्हणजे सत्याचा विजय साजरा करण्याचा एक सुंदर आणि ऐतिहासिक क्षण आहे. असे प्रतिपादन माजी नगरसेवक रामदास आंधळे यांनी केले. 


  

    पारिजात चौक येथे दसऱ्यानिमित्त 51 फुटी रावणाचे दहन शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती , तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक रामदास आंधळे, भाजपा शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे,  ॲड लक्ष्मीकांत पटारे,शिरीष जानवे, प्रदीप घोडके, बाळासाहेब सोनवणे,प्रसाद पाठक, अभिजीत दरेकर, विशाल साबळे, रमेश शिरसाठ, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

गुलमोहर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही पारिजात चौक येथे रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी सावेडी उपनगरातील हजारो नागरिक उपस्थित होते. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सर्वांचे आकर्षण ठरले


Post a Comment

0 Comments