भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा

 भिंगार मध्ये रंगला पहाटे पर्यंत कलगीतुरा


नगर : भिंगार येथे नवरात्रातील तिसर्‍या माळेची रात्र जागविणार्‍या ’कलगीतुर्‍याचा कार्यक्रम शनिवारी रात्री ते रविवार पहाटे पर्यंत उत्साही गर्दीने साजरा झाला. 

    कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आली.कलगी आणि तुरेवाले अशा दोन गटांतील शाहिरांमध्ये रंगलेल्या वादाला रसिकांनी भरभरुन दाद दिली.शाहिरांच्या कणखर आवाजाला डफ आणि तुणतुण्याची साद होती.

    शाहिर :- अण्णा साहेब चौरे (सर), शंकर बाबुराव म्हस्के, लहुदादा कदम, गोरख धस, एकनाथ पवार मेजर, बबन चौरे, सागर चौरे, शिवाजी कवडे, अंबादास बैदे, सदगुरु गोंधाराम चौरे गुरुजी, अशोक जासुद, नारायण तुकाराम डमाले, रामभाऊ सहोदे, पाराजी पानसांबळ, राजू निमसे, साहेबराव पवार, कृष्णा फंटागरे, मंयक कर्डीले, निजामभाई शेख, शांताराम किमकर साहेब, शिवाजी ठाणगे, कान्हु सुंबे, बाळासाहेब भुतकर, रामभाऊ साकरे, विठ्ठल व्यवहारे, लक्ष्मण भांबरे इत्यादी शाहिरांनी सहभाग नोंदवला. 

     महिलेच्या कपाळावरील कुंकु आणि श्रृंगारावरुन तिचे वैवाहिक जिवन लक्षात येते. त्याचप्रमाणे तिला आलेले वेद्यव्य देखील कपाळावरचे नसलेले कुंकु सांगते. महिलेबाबत असे असतांना पुरुषाबाबत का नाही? या विषयावरुन कलगी व तुरेवाले शाहिरामध्ये जुगलबंदी रंगली होती.

     कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब कर्डिले स्वागत करतांना म्हणाले की गेली साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या कलगीतुर्‍याच्या कार्यक्रमासाठी शाहिर व त्यांची काहिहि मिळण्याची अपेक्षा नसते.

     आमदार व शाहिरांचा सत्कार भाऊसाहेब कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. चहा-पाणी, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. सौ. उज्वला भंडारी यांच्यातर्फे केळी वाटण्यात आली. 

     कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्तेसाईनाथ गोत्राळ, आदित्य दिवटे, असलकर मामा, जय नागपुरे, गणेश साठे, महेशशेट झोडगे, दिपक कर्डिले, सार्थक साठे, ऋषिकेश परदेशी, गोट्या वाधीरे, पुप्पु भुतकर, लोकेश मेहतानी, शुभांगीताईसठे, उज्वला भंडारी, हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments