सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांना अटक
धारावी मशीद वाद : बीएमसीच्या वाहनांची तोडफोड
मुंबई : महाराष्ट्रातील धारावी येथे बेकायदेशीर मशीद पाडल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी रविवारी ३ जणांना अटक केली. या तिघांवर दंगल भडकवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि रस्ते अडवणे असे आरोप आहेत. शनिवारी बीएमसीने मशिदीच्या बेकायदा भाग पाडण्याच्या कारवाईदरम्यान मोठा जमाव जमला होता. जमावाने तोडफोडीला जोरदार विरोध केला होता. यावेळी जमावाने बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडून गोंधळ घातला.
मुंबई पोलिसांनी सांगितले की घटनास्थळी सुमारे 5 हजार लोकांचा जमाव जमला होता. गर्दीत अनेक बाहेरचे लोकही होते. पोलीस धारावी बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पटवत आहेत. बीएमसीच्या विध्वंसाच्या कारवाईच्या विरोधात जमाव जमवण्यासाठी भडकाऊ पोस्ट आणि व्हिडिओ बनवण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. या पोस्ट आणि व्हिडिओ शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होऊ लागले. बीएमसीच्या कारवाईच्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी धारावीतील मशीद परिसरात मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलक रस्त्यावर बसले. यानंतर पोलिसांचे पथक आले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
0 Comments