भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनेल

 भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनेल 



 आ.संग्राम जगताप : प्रभाग क्रमांक १ मध्ये संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून जय भवानीनगर मधील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे  लोकार्पण 

नगर : शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्तबाग महालाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले जाईल कुठलेही काम रातोरात होत नसते, त्यासाठी व्हिजन व नियोजन लागते तीच मंडळी सकारात्मक काम करू शकतात आरोप हा काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत असतो जो काम करत नाही त्याच्यावर कुठलीही चर्चा होत नसते आता परतीचा पाऊस सुरू झाला असून छत्र्या येतील निवडणूक संपली की, ते गायब होतील हे आता महापालिका निवडणुकीपर्यंत चालू राहील. समाज व्यवस्थेमध्ये विकासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी प्रभागाच्या विकास कामासाठी पाठपुरावा केल्यामुळेच प्रभागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्यांना मिळाले आहे, ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सुख सुविधा देण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

          प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून जय भवानीनगर मधील अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेविका मीना चव्हाण, जयभवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष संपत बारस्कर, अरुण आहेर, अनिल देवकर, सिद्धार्थ काळे, विठठ्ल खेंडके, भाऊसाहेब पिसाळ आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 पूर्वी तपोवन रोडवरती राजकारण करत आपली राजकीय स्वार्थ साधला जात होता मात्र मी आमदार झाल्यानंतर तपोवन रोड हा फक्त नकाशावर होता तो मी प्रत्यक्षात उतरविला असल्यामुळे या भागाच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आणि नागरिक आपल्या आपल्या घराची स्वप्न पूर्ण करू शकले आहे पूर्वी कधीही कॉंक्रिटीकरणाची रस्ते पहावयास मिळत नव्हती आता मात्र सर्वत्र दर्जेदार कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याची कामे सुरू आहेत पुढील एप्रिल महिन्यापर्यंत बहुतांश रस्त्याची कामे पूर्ण होतील, शहरातील बहुतांश कॉलनी अंतर्गत विकासाचे कामे पूर्ण झाली असल्यामुळे सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाची कामे मार्गी लावली आहे आमदार संग्राम जगताप यांनी काम करण्याची संधी दिली त्यामुळेच एक एक प्रश्न हाती घेऊन सोडविले, सावेडी हे नव्याने विकसित होणारे उपनगर असून मूलभूत प्रश्नांपासून कामे करावी लागली आहेत, जयभवानी नगर मधील नागरिक एक विचाराने राहत असून सार्वजनिक कामासाठी एकत्र येत आपले कर्तव्य पार पाडत आहे त्यामुळे या परिसराच्या विकासाला गती मिळाली इतर कॉलनीतील नागरिकांनी देखील त्यांचा आदर्श घेत आपापल्या भागाच्या विकासासाठी पुढे यावे प्रभागातील नागरिकांना दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण करू शकलो असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी व्यक्त केले

 जय भवानी नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून नागरिकांनी आपापल्या दारामध्ये रांगोळी काढून स्वागत करत स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी नव मतदारांचे स्वागत केले, आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकास कामातून परिवर्तन घडवून आणले असून खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहे आमदारांची टीम चांगली असून ते आपापल्या भागामध्ये चांगले काम करत आहे आता जयभवानी नगर मधील नागरिक आमदार संग्राम जगताप यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार असून एक क्लिक विकासाची हॅट्रिक हा संदेश दिला जाणार असल्याचे मत रहिवासी अनिल देवकर यांनी व्यक्त केले

Post a Comment

0 Comments