आरोग्याला आवश्यक जीवनसत्व मिळवण्यासाठी योग्य आहाराची गरज

आरोग्याला आवश्यक जीवनसत्व मिळवण्यासाठी योग्य आहाराची गरज 

मनपाच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात पोषण आहार सप्ताह निमित्त जनजागृती  

नगर : आपल्या आरोग्याला आवश्यक असणारे जीवनसत्व मिळवण्यासाठी योग्य आहाराची गरज असून त्याचा समावेश आपल्या दररोजच्या जेवणात असावा, जेणेकरून कॅल्शियम, हिमिग्लोबीन कमी होणार नाही , आणिआपल्याला डॉक्टरांच्या औषधांची गरज भासणार नाही, यात भरड धान्ये, कडधान्य , राजगिरा, ज्वारी बाजरी नाचणी, राळे, पालेभाज्या आदींचा समावेश असणे गरजेचे असून स्वयंपाक करत असतात स्वच्छ पाण्याने भाजी धुवाव्या, योग्य पद्धतीने शिजवावे, भाज्या शिजवलेले पाणी टाकून न देता ते पाणी भाजीसाठीच वापरावे, मातांनी आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराचा वापर करावा, जेणेकरून आपल्या बालकाचे आरोग्य निरोगी राहील, बालकाची बालवयातच योग्य काळजी घ्यावी, कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल नेहमीच गरोदर मातेची काळजी घेत असून त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. आईचे दूध बाळाची रोग प्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करते, पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करून मातांना योग्य मार्गदर्शन करीत  याविषयी जनजागृती केली जाते या माध्यमातून आरोग्यदायी पिढी निर्माण होईल असे प्रतिपादन आहार तज्ञ किरण मकासरे यांनी केले.

      अहमदनगर महानगरपालिकेच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात पोषण आहार सप्ताहनिमित्त मातांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आले, यावेळी आहार तज्ञ किरण मकासरे, डॉ दीपमाला चव्हाण, डॉ. गुलनाझ  शेख, डॉ. शिल्पा पाठक. डॉ. प्रवीण डोंगरे, आदीसह अधिकारी कर्मचारी व गरोदाता माता उपस्थित होते  

       डॉ. प्रवीण डोंगरे म्हणाले की, बाळ आणि माता या दोघांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी पोषण आहार महत्वाचा असतो, बाळ जन्मल्यापासून अर्धा तासात आईचे दुध बाळाला देणे आवश्यक असते. आईच्या दुधात ऍन्टीबॉडीज असतात जे लहान मुलांना विविध आजार आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्या बाळांना स्तनपान दिले जात नाही त्यांना श्वसनमार्गाचे संक्रमण, कानाचे संक्रमण,आणि इतर रोग होण्याचा धोका जास्त असतो. असे ते म्हणाले.

        डॉ. गुलनाझ  शेख म्हणाल्या की, बाळ झाल्यानंतर आईची जबाबदारी जास्त वाढते. कारण बाळ मोठे होईपर्यंत, वरचे दूध किंवा इतर अन्नघटक त्याच्या पोटात जाईपर्यंत त्याचे भरण पोषण आईच्या स्तन पानावर चालते. त्यामुळेच आईला स्वतःचे आरोग्य त्याचप्रमाणे बाळाचे आरोग्य चांगले रहावे मजबूत राहावे यासाठी योग्य आहार करणे अत्यंत गरजेचे आहे.असे त्या म्हणाल्या

      डॉ. दीपमाला चव्हाण म्हणाल्या की, मनपाच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या माध्यमातून आई आणि बाळासाठी आरोग्याबाबत विविध उपक्रम राबवत मातांमध्ये जनजागृती केली जात असून आज आहार सप्ताह दिनानिमित्त बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये पालेभाज्या, कडधान्य बाबत प्रदर्शन भरवत त्याचे फायदे याविषयी मातांमध्ये जनजागृती केली असे त्या म्हणाल्या. 


Post a Comment

0 Comments