विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडल्या

विनयभंग करणाऱ्या शिक्षकाने सर्व मर्यादा ओलांडल्या

उल्हासनगर : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात पोलिसांनी एका खासगी शाळेतील शिक्षकाला सात वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा शारीरिक शिक्षणाचा शिक्षक आहे. त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

अधिकारी म्हणाले, 'शिक्षकाने शाळेच्या आवारात मुलीचा विनयभंग केला. मुलीने नंतर याबाबत तिच्या पालकांना सांगितले, त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून गुरुवारी तक्रार दाखल केली.

बदलापूर येथे घडलेल्या घटने नंतर लगेचच ही घटना घडल्याने पालकांत खळबळ माजली आहे. अश्या घटनांवर तातडीने कठोर कारवाई करून शासनाने त्यास पायबंद घालावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. 

Post a Comment

0 Comments