एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या 

वेब टीम औरंगाबाद : खुनाच्या घटनांनी हादरले आहे. गेल्या 24 तासात शहरात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील रेल्वे स्टेशन भागात भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एकतर्फी  प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. ग्रंथी सुखप्रीत कौर  प्रितपालसिंग ( वय 22 वर्षे ) असे मृत हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत असलेल्या ग्रंथीचा आज देवगिरी महाविद्यालयाच्या पाठीमागील भागात मृतदेह आढळून आला आहे. तर या तरुणीच्या अंगावर जखमा पाहायला मिळून आले आहेत. धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून हा खून करण्यात आल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून आरोपीच्या शोधात पथक तैनात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी  शहरातील नारेगाव भागात एका तरुणीचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणीचा खून झाल्याने शहर हादरले आहे. 

पोलीस आरोपीच्या शोधात... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी आणि आरोपी दोन्ही एकाच समाजातील असून दोन्ही एकमेकांना चांगले ओळखत होते. खुनाची घटना समोर येताच पोलिसांचे चार पथक आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले आहे. तर मुलीचा मृत्तदेह उत्तर तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात अली आहे. 

गेल्या चोवीस तासात दोन खून.... 

औरंगाबाद शहरात गेल्या चोवीस तासात दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. कटकट गेट भागातील साबिर शहा कासीम शहा ( वय 36, वर्षे रा. नेहरूनगर ) नावाच्या व्यक्तीचा शुल्लक कारणावरून फरहान खान निजाम खान ( वय 19 वर्षे  धंदा मजुरी रा. नेहरूनगर ) नावाच्या तरुणाने भोसकून खून केला आहे. ही घटना घडून काही तास उलटत नाही तो आता पुन्हा एक खुनाची घटना समोर अली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments