नगरशहारात गणेशोत्सवाची मोठी धामधूम
शहरात पौराणिक, सामाजिक देखाव्यांची रेलचेल
नगर : विशाल गणपती मंदिरात जिल्हाचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली . तेव्हापासूनच गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली ती उत्तरोत्तर रंगत आहे. विशाल गणपती मंदिरास तसेच शहरातील अन्य मंदिरांना केलेल्या विधुत रोषणाई मूळे उत्सवाची रंगात वाढली . त्यातच मग गणेशोत्सवात केले जाणाऱ्या देखाव्या मूळे त्याची रंगत वाढत आहे.
विशालगणपती मंदिरात पोलिस अधीक्षक श्री.ओला दाम्पत्याच्या हसत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली .
नगरच्या विशालगणपती मदिराला,आणि शमी गणपती मंदिराला आकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली आहे.
टिळक रस्त्यावरील लोकमान्य टिळक मित्रमंडळाने यंदा २५ फूटी गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.
आशा टॉकीज जवळील तात्या टोपे मित्र मंडळाने यंदा लालबागच्या राजाची मूर्तीची स्थापना केली आहे.
नेतासुभाष मित्रमंडळाने यंदा पारंपारिक रिद्धीसिद्धी गणेशाची स्थापना केली आहे. लक्ष्मी कारंजा येथील बजरंग मार्कडेय मित्रमंडळाने बालाजी रूपातील गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. तर नवीपेठ रस्त्यावर,आणि आशा टॉकीज चौकात केलेल्या रोषणाई ने गणेशोत्सवात रंग भरला आहे.
शिववरद प्रतिष्ठाणाने यंदा पावनखिंड हा ऐतिहासिक हलता देखावा देखावा सादर केला आहे. जय आनंद युवक मंडळाने यंदा शिव राज्याभिषेक हा देखावा सादर केला आहे. कापडबाजार व्यापारी मंडळाने यंदा अश्वारूढ गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. भिंगारवाला चौकातील व्यापारी मंडळाने यंदा ब्रॉन्झ धातूपासून तयारकेलेली दशभुजा गणपतीची स्थापना केली आहे.भिंगारवाला चौकातील व्यापारी मित्रमंडळाने यंदा मोटुपतलू कि जोडी हादेखावा सादर केला आहे .
सातभाईगल्ली गणेश मंडळाने वीसफुटी बालाजी मंदिराची प्रतिकृतीत गणेशाची स्थापना केली आहे. जुन्या वसंत टॉकीज जवळील संगम तरुण मंडळाने अष्टभुजेसह गणेशाची स्थापना केली आहे .तर बागरोजा हडको येथील शिवप्रतिष्ठानने यंदा महादेवाच्या रूपातील गणेशाची स्थापना केली आहे. कोर्टगल्लीतील ज्ञानेश्वर चौक येतील आदर्श युवक मंडळाने संत ज्ञानेश्वर आणि चांगदेवमहाराजांच्या भेटीचा प्रसंग हा देखावा सादर केला आहे.
नालेगाव येथील नवग्रह युवकमंडळाने यंदा प्लास्टिकचा भस्मासूर हा देखावा सादर केला आहे. नालेगावातील हिंदुत्व प्रतिष्ठानने यंदा श्रीराममंदिराच्या पार्श्वभूमीवर रामाच्या रूपातील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. नवरंग व्यायामशाळा तरुणमंडळाने यंदा गजरथारुढ गणेशाची स्थापना केली आहे. दालमंडई युवकामंडळाने शिवरायांच्या गोरक्षणाचा देखावा सादर केला आहे.
माणिक चौक गणेश मंडळाने यंदा बेटी बचाव ,बेटी पढाओ हा सामाजिक विषयावर आधारित देखावा सादर केला आहे. महावीर प्रतिष्ठाणने यंदा मार्कडेय कथा हा पौराणिक देखावा सादर केला आहे.समझोता तरुण मंडळाने यंदा अष्टविनायक दर्शन हा देखावा सादरकेला आहे.
नवा टिळक रस्त्यावरील नंदनवन मित्र मंडळाने यंदा सण नागपंचमीचा हा देखावा सादरकेला आहे.नेता सुभाष तरुण मंडळाने यंदा हनुमंत द्रोणागिरी पर्वत आणतो हा देखावा सादर केला आहे.या देखाव्यात हनुमंताचे प्रेक्षकांवरून होणारे उड्डाण हा आकर्षणाचा विषय ठरत आहे.
एकूणच सालाबादप्रमाणे याही वर्षीचा गणेशोत्सव मोठा रंगतदार पद्धतीने साजरा होत आहे.
0 Comments