राज्यात महायुतीचेच सरकार येणार : म्हस्के

राज्यात महायुतीचेच सरकार येणार : म्हस्के 

नगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,तथा राज्याचे अर्थमंत्री  अजित पवार यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने विविध लोकोपयोगी योजना जाहीर केल्या आहेत.  विविध विकास कामे सुरू असून आगामी विधानसभेत आम्ही हीच कामे आणि योजना घेऊन लोकांसमोर जाऊ आणि आगामी विधान सभेत बहुमताने महायुतीचेच  सरकार सत्तेत येईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले . 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  ,राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत अडीच लाख भगिनींना  या योजने लाभ मिळालेला आहे , त्यापैकी दीड लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.  लवकरच उर्वरित एक कोटी भगिनींच्या खात्यात लवकरच  पैसे जमा होतील,  असे ते म्हणाले . 

अजित पवार यांच्या पुढाकाराने जाहीर केलेल्या कृषी योजनेतून तीन ,पाच व साडेसात हॉर्स पॉवरच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा ,राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि महिलांना गॅसच्या तीन टाक्या मोफत देण्याची योजना आणि विविध विकासकामे सुरु आहेत . या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  तसेच योजनांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.  तिचा मोबाईल नंबर  98 61 71 71 71  असा असून या व्हाट्सअप क्रमांकावर नागरिकांना हव्या असलेल्या योजनेची माहिती देण्यासाठी मुंबई येथील पक्षाच्या मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती ताराचंद म्हस्के यांनी दिली.या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणींचे टेक्निकल टीमच्या माध्यमातून तात्काळ निवारण केले जाईल असे ते म्हणाले .  

 जागा वाटप बाबत बोलताना म्हस्के  म्हणाले भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस  यांचे पक्षश्रेष्ठि   याबाबत निर्णय घेतील आणि सौहार्दपूर्ण  वातावरणात जागावाटप होईल आणि  आगामी काळात महायुतीचे सरकार राज्यात येईल असा विश्वासही पक्षाचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी  व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments