आईचे दूध बाळाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करते - डॉ. दिपाली अनभुले

 आईचे दूध बाळाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करते - डॉ. दिपाली अनभुले


नगर : मातांनी आपले आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी योग्य आहाराचा वापर करावा, जेणेकरून आपल्या बालकाचे आरोग्य निरोगी राहील, बालकाची बालवयातच योग्य काळजी घ्यावी, शासनाच्या वतीने बालकाला दिले जाणारे लसीकरण मोफत असून योग्य वेळी सर्व लसीकरणाचा डोस पूर्ण करावा, कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल नेहमीच गरोदर मातेची काळजी घेत असून त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. आईचे दूध बाळाची रोग प्रतिकारक शक्ती विकसित करण्यास मदत करते, स्तनपान सप्ताहाचे आयोजन करून मातांना योग्य मार्गदर्शन करीत बाळाची घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती केली जाते या माध्यमातून आरोग्यदायी पिढी निर्माण होईल असे असे प्रतिपादन डॉ. दिपाली अनुभुले यांनी केले.
        अहमदनगर महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनपान सप्ताहनिमित्त मातांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आले, यावेळी डॉ. दिपाली अनभुले, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. आदित्य पानसंबळ, डॉ.सोनल बोरुडे, डॉ. दीपमाला चव्हाण, रोटरी क्लब अहमदनगर सेक्रेटरी मॉर्निंग एलिंशा डॉ. ममता गांधी, डॉ. उज्वला शिरसाठ, डॉ. शिल्पा पाठक, डॉ. श्रेयस सुरपुरे आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते  
       डॉ. विक्रम पानसंबळ म्हणाले की,  बाळ आणि माता या दोघांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी स्तनपानाचे महत्त्व वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाच्या कमतरतेमुळे बाळ आणि आई दोघांच्याही आरोग्यावर विविध परिणाम होऊ शकतात, त्यामुळे स्तनपानाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. आईच्या दुधात ऍन्टीबॉडीज असतात जे लहान मुलांना विविध आजार आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्या बाळांना स्तनपान दिले जात नाही त्यांना श्वसनमार्गाचे संक्रमण, कानाचे संक्रमण,आणि इतर रोग होण्याचा धोका जास्त असतो.
       डॉ. आदिती पानसंबळ म्हणाल्या की, बाळ झाल्यानंतर आईची जबाबदारी जास्त वाढते. कारण बाळ मोठे होईपर्यंत, वरचे दूध किंवा इतर अन्नघटक त्याच्या पोटात जाईपर्यंत त्याचे भरण पोषण आईच्या स्तन पानावर चालते. त्यामुळेच आईला स्वतःचे आरोग्य त्याचप्रमाणे बाळाचे आरोग्य चांगले रहावे मजबूत राहावे यासाठी योग्य आहार करणे अत्यंत गरजेचे आहे.असे त्या म्हणाल्या
      डॉ. दीपमाला चव्हाण म्हणाल्या की, मनपाच्या कै.बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या माध्यमातून आई आणि बाळासाठी आरोग्याबाबत विविध उपक्रम राबवत जनजागृती केली जाते, सर्वसामान्य कुटुंबातील मातांना मोफत आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम केले जात असून रुग्णांचा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलवर असलेला विश्वास वाढवण्यासाठी आम्ही सार्वजन काम करत आहोत, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाउन ही संस्था आम्हाला सातत्याने सहकार्य करत असतात असे त्यांनी सांगितले
      यावेळी स्तनपान सप्ताह निमित्त डॉ.सोनल बोरुडे, डॉ. ममता गांधी, डॉ. उज्वला शिरसाठ, डॉ. शिल्पा पाठक, डॉ. श्रेयस सुरपुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले 

Post a Comment

0 Comments