"नगरमनमाड रस्ताप्रकरणी" जिल्ह्यातील दोन्हीही खासदारांनी आपल्या खासदारकीचे राजीनामे द्यावेत....ॲँड. सुरेश लगड

 "नगरमनमाड रस्ताप्रकरणी" जिल्ह्यातील दोन्हीही खासदारांनी आपल्या खासदारकीचे राजीनामे द्यावेत....ॲँड. सुरेश लगड



वेब टीम अहमदनगर:आपल्या जिल्ह्यातुन जाणारा नगरमनमाड रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा बनला.अक्षरशा जीव मुठीत धरून वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागतात.अनेक व्यक्ति  या रस्त्यात बळी गेलेले आहे .काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.अस असुनही आपले जिल्यातील दोन्हीही खासदारांनी गप्प बसणं पसंत केले.खासदार सुजय विखे यांनी नगरच्या उड्डाणपूलासाठी जसे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तसे नगरमनमाड रस्ता दुरुस्तीसाठी  प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते तर इतक्या दिवसात नगरच्या उड्डाणपूलासारखा हाही प्रश्न मार्गी लागला असता.केवळ गप्पा मारुन व मिटींगावर मिटींगा घेऊन उपयोग होत नसतो.आपण दोघेही खासदार लोकशाही मार्गाने निवडुन आलेले आहात.आपल्या राज्यात व केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार असुनही नगरमनमाड रस्ता दुरुस्ती प्रकरणी कुठलीही ठोस कार्यवाही आपले दोन्हीही खासदारांकडुन होताना दिसत नाही हे आम नगरकरांचे दुर्दैव आहे.विशेष म्हणजे आपले पिताश्री राधाकृष्ण विखे तर राज्य सरकारमधे कॅबिनेट मंत्री आसुन त्यांचे व तुमचे सरकार दरबारी मोठे वजन असुनही त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी स्विकारुन दोन्हीही कर्तबगार खासदारांनी आपल्या खासदारकीचे पदाचा राजीनामा द्यावा.अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ  ॲँड..सुरेश लगड यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments