दिल्लीत दिवसाढवळ्या १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला

 दिल्लीत दिवसाढवळ्या १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला, 

बहिणीसोबत जात असताना दुचाकी शेजारी थांबली अन्…

वेब टीम नवी दिल्ली : दिल्लीत दिवसाढवळ्या १७ वर्षीय मुलीवर अॅसिड हल्ला, बहिणीसोबत जात असताना दुचाकी शेजारी थांबली अन्…

अॅसिड हल्ल्याने दिल्ली हादरली

दिल्लीत एका १७ वर्षीय मुलीवर दिवसाढवळ्या अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. द्वारका परिसरात ही दुर्घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन आरोपींनी मुलीवर अॅसिड फेकलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुलीची प्रकृती गंभीर असून तिचा सर्व चेहरा भाजला आहे. तिच्या डोळ्यातही अॅसिड गेलं आहे. मुलीने दोन आरोपींची ओळख पटवली असून, एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सीसीटीव्हीत मुलगी रस्त्यावरुन चालत असताना शेजारुन जाणारी एक दुचाकी आपला वेग कमी करते आणि यानंतर एक आरोपी तिच्यावर अॅसिड फेकतो. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मुलगी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून पळताना दिसत आहे.

“माझ्या दोन्ही मुली सकाळी एकत्र घराबाहेर पडल्या होत्या. यावेळी अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोठ्या मुलीवर अॅसिड फेकलं,” अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

मुलीने कोणी त्रास देत असल्याची तक्रार केली होती का? असं विचारण्यात आलं असता वडील म्हणाले “नाही, तिने अशी कोणतीही तक्रार केली नव्हती. ती कुठेही गेली तरी मी सोबत असायचो. दोघी बहिणी शाळेत जाताना मेट्रोने एकत्र प्रवास करायच्या”.

Post a Comment

0 Comments