ड्रेनेज लाईन,दूषित पाणी व खराब रस्त्यांच्या विरोधात आयुक्त दालनात ठीय्या

ड्रेनेज लाईन,दूषित पाणी व खराब रस्त्यांच्या विरोधात आयुक्त दालनात ठीय्या

दूषित पाणी व ड्रेनेज मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - नगरसेवक डॉ.सागर बोरुडे 

वेब टीम नगर : प्र.क्र. ७ नागपूर बोलेगाव मधील सौरभ रो हाउसिंग मधील नागरिक विविध विकासाच्या प्रश्नांपासून वंचित आहेत आमच्याकडे महापालिकेच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत नागरिक विविध प्रश्नांना अहोरात्र तोंड देत आहेत आम्ही महापालिकेचे सर्व कर भरूनही विकास कामांपासून वंचित आहोत उलट पिण्याच्या दूषित पाण्यामुळे आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे ड्रेनेजच्या लाईन नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे आम्हाला प्रवास करण्यासाठी चांगला रस्ताही नाही या सर्व प्रश्नांमुळे आमचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आम्हाला कोणी वाली आहे का असे विविध प्रश्न या भागातील नागरिकांनी आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना केले.

          नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त कार्यालयात सौरभ रो हाऊसिंग सोसायटी येथील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी स्नेहलता कांबळे, मंगल मंचर, कविता राठोड, सुनंदा रासकर, वर्षा लोंढे, पुनम मगर, नंदा जाधव, विजया बोडके, सुनिता घाटविसावे, सुनीता पाहेरे, राजाराम पालघर, सुशीला पांढरकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी शिष्टमंडळास सांगितले की लवकरच या भागातील रस्त्यांची कामे सुरू होतील दूषित पाण्याचाही प्रश्न तातडीने मार्गी लावू तुमची ड्रेनेज लाईन ची समस्या ही सोडू असे आश्वासन यावेळी आंदोलकांना दिले.

चौकट - या आंदोलनातील महिला मंगल मंचर यांना दूषित पाण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांचा आवाज बसला आहे आंदोलनावेळी अस्वस्थ जाणवायला लागल्यामुळे त्यांना आयुक्त दालनातच थोड्यावेळ विश्रांती घ्यावी लागली.

Post a Comment

0 Comments