आयुक्त साहेब नागरिकांना पाणी द्या स्मशानभूमी ची व्यवस्था नंतर करा

  आयुक्त साहेब नागरिकांना पाणी द्या स्मशानभूमी ची व्यवस्था नंतर करा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

वेब टीम नगर : अहमदनगर महानगरपालिका चे ठेकेदारी पद्धतीने लावलेले वॉलमन यांनी अचानक संपावर गेल्याने उपनगरा मध्ये पाणी सोडले नाही. या बाबत वॉलमान शिदे याच्या बरोबर चर्चा केली असता ठेकेदाराने तीन महिन्यापासून पगार दिला नाही म्हणून 30 ते 40 वॉलमननी काम बंद ठेवले. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा केली असता महानगरपालिकेने संबधित ठेकेदाराचे पैसे दिले नाही म्हणून त्याने वॉलमन ला पगार दिला नाही असे समजले.

एकीकडे महानगरपालिका नागरिकांच्या स्मशानभूमी साठी 32 कोटी खर्चायला तयार आहे पण नागरिकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्याची व त्याकामी ठेकेदाराला रक्कम देण्याची तयारी दिसत नाही. या बाबत संबधित अधिकारी ही बेजबाबदार पणे वागत असल्याची माहिती मिळाली आहे. फेज -2 ची योजना सुरु झाली अशी गाजावाजा करणारे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी पाणी सोडण्याचे काय नियोजन केले हे दिसून येत नाही.

आयुक्त साहेब नागरिकांना पाणी पाजून जगू द्या, नंतर त्यांच्या मरणाची वाट पाहून स्मशानभूमीची व्यवस्था करा  असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments