पीक विम्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक

पीक विम्याच्या बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक 

वेब टीम संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांकडून पीक विमा हप्त्याची रक्कम घेऊन त्यांना बनावट पीक विमा हप्त्याच्या पावत्या देणाऱ्या आपले सरकार ई महासेवा केंद्र मालक आणि  चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.प्रसन्ना गोरे (मालक,आपले सरकार ई महासेवा केंद्र,पूर्ण नाव,पत्ता माहीत नाही) प्रवीण सुधाकर ताजणे (चालक,आपले सरकार ई महासेवा केंद्र, रा.ढोलेवाडी,ता.संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments