सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून नराधम फरार

सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून नराधम फरार 

वेब टीम राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील एका सात वर्षीय मुलीवर अत्याचार करून नराधम पसार झाला आहे.दि.१६ जुलैला राहुरी तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली.अत्याचार झालेली चिमुरडी आपल्या घरात एकटी असताना एका नराधमाने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला.ही घटना पाहणाऱ्याने आरडा ओरड केल्याने हा नराधम घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.तिच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल भास्कर दिवे,रा.कणगर,ता.राहुरी या नराधमाच्या विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची खबर मिळताच श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे,पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील,मधुकर शिंदे व पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके व पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.या घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
Post a Comment

0 Comments