अल्पवयीन मुलीवर बलात्कार ;आरोपीस २ वर्षे कारावास पाच हजाराचा दंड
वेब टीम नगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी शुभम आप्पासाहेब दिघे यांस भादवी कलम 376 आय एन ३५४ ड ५०४ ५०६ व बालकांचा लैंगिक अपराधापासून प्रतिबंधक कायदा कलम ३-४ व १२ प्रमाणे गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्याला न्यायमूर्ती श्रीमती एम एच मोरे मॅडम यांनी आरोपीस ३५४ ड अन्वये दोन वर्षे कारावास तसेच बालकांचा लैंगिक अपराधापासून प्रतिबंधक कायदा कलम ३-४ व १२ पाच हजार रुपये दंड. व दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली .
घटनेची थोडक्यात माहिती अशी केडगाव उपनगरात बालाजी कॉलनी सर्वे नंबर 37 मधील घरात व चास गावचे शिवारातील नगर पुणे हायवे रोडवरील आबासाहेब भारस्कर यांच्या मालकीचे कन्यारत्न लॉज मध्ये 27 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी दोन वाजेपासून एक जानेवारी 2019 रोजी दरम्यान च्या सुमारास सदरचा अपराध घडला . यातील आरोपी नामे शुभम आप्पासाहेब दिघे वय २२ वर्षे राहणार मोती नगर केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर याने पीडित फिर्यादी वय 15 वर्ष सात महिने हिचा पाठलाग करून , तिच्याशी गोड गोड बोलून तिला लग्नाचे आमिष देऊन तिचा विश्वास संपादन करून चास येथील हॉटेल कन्यारत्न येथे नेऊन, तसेच फिर्यादीच्या राहत्या घरात फिर्यादीवर बळजबरीने शरीर संबंध केले. तू माझ्याबरोबर आली नाहीस तर मी तुझ्या आई-वडिलांना आपल्या संबंधाबाबत सांगून तुझी केडगाव मध्ये बदनामी करीन अशी धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि .क्र ७/१९ नुसार फिर्याद दाखल झाला होता.
याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने ७ साक्षीदार तपासले कोर्ट पैरवी म्हणून उत्कर्षा वडते यांनी काम पाहिले तर सरकारी वकील मनीषा केळगंद्रे व त्यांना सहकार्य म्हणून ॲड.सचिन पटेकर यांनी काम पाहिले.
0 Comments