पोखर्डी सेवा संस्थेचे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण
वेब टीम नगर : आपल्या सामाजिक गरजा,आकांक्षा पूर्ण करायच्या तर शेतकर्यांना मुख्य आधार असतो तो विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा. नावाप्रमाणे गावपातळीवर शेतकर्यांना कर्जपुरवठा करणारी सहकारी सोसायटी असते.कर्ज घेऊन छोट-छोटे उद्योग व्यवसाय, शेतीला आधार होतो.यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळते,असे प्रतिपादन चेअरमन आसाराम वारुळे यांनी केले.
नगर तालुक्यातील शेतकर्यांसाठी कामधेनू म्हणून ओळख असलेल्या पोखर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची यंदाही ३० जून २०२२ अखेर १०० टक्के वसूली झाली.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल पोखर्डी एडीसीसी बँकेचे शाखाधिकारी कृष्णा संभार, प्रिती हरदास,विनिता शेजूळ,सोसायटीचे अध्यक्ष आसाराम वारुळे,उपाध्यक्ष सुभाष कराळे,सचिव संजय आल्हाट आदिंचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सोसायटीचे सदस्य संपत निमसे,पांडूरंग निमसे,कचरु कराळे,दशरथ कराळे,बबन चौरे,लक्ष्मण देठे,मच्छिंद्र सुसे, नंदकुमार वारुळे,देवीदास कराळे,अमोल आल्हाट,आदम देठे,त्रिंबक निमसे,सुरेश वारुळे आदि उपस्थित होते.
श्री.वारुळे म्हणाले सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना पीक कर्जही देण्यात येते त्याचबरोबर खते, बियाणे, शेतीची अवजारे,यासाठी पोखर्डी सोसायटीने सभासदांना कर्ज पुरवठा केला.सभासदांनी कर्जाची फेड वेळेत केली.वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सोसायटीचे सदस्य, सचिव या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले,यामुळे १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.सदस्य संपत निमसे यांनी मयत सभासदांच्या खात्याबाबत प्रश्न उपस्थित केला. याबाबत शाखाधिकारी संभार यांनी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
0 Comments