ईद निमित्त वाहतूक रस्त्यात करण्यात आलेला बदल

ईद निमित्त वाहतूक रस्त्यात करण्यात आलेला बदल 

वेब टीम नगर : मुस्लिम समाजाच्या 'बकरी ईद' सणानिमित्त रविवार (ता.१०) 'कोठला ईदगाह' मैदानावर नमाज होणार आहे.हे मैदान अहमदनगर-पुणे महामार्गालगत आहे.यामुळे याठिकाणी वाहनांची गर्दी होऊ नये.यासाठी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.अहमदनगर-पुणे मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज/हॉर्नमुळे नमाज पठणात व्यत्यय येतो.तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार रविवारी (ता. १०) सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत येथील वाहतूक वळविण्यात आली आहे. औरंगाबादकडून येणारी सर्वप्रकारची वाहने एसपीओ चौक- न्यायनगर मार्गे, बेलेश्वर चौक- भुईकाेट किल्ला चौक- जीपीओ चौक- चांदणी चौक मार्गे वळविण्यात आली आहेत. पुणे रोडकडून येणारी वाहने जीपीओ चौक- भुईकाेट किल्ला चौक- बेलेश्वर चौक- न्यायनगर मार्गे- एसपीओ चौकाकडे वळविण्यात आली आहेत.

Post a Comment

0 Comments