फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने आय.जी.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचा सत्कार

फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने आय.जी.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचा सत्कार 

वेब टीम नगर: फॅमिली कोर्ट ॲडव्होकेट बार असोसिएशन अहमदनगरचे पदाधिकारी यांनी नाशिक परिक्षेत्राचे स्पेशल आय. जी. डाॅ. बी जी शेखर पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे.पोलिस प्रशासन आणि भरोसा सेल यांचे कडून येणारे अडीअडचणी संदर्भात चर्चा केली. त्यावेळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते. सर्व पोलिस अधिकारी यांचा फॅमिली कोर्ट ॲडव्होकेटस् बार असोसिएशन अहमदनगरच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

उपस्थित केलेल्या अडीअडचणी बाबत श्री. शेखर पाटील यांनी सांगितले की, यापुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आमची कोणत्याही पोलिस अधिकारी यांचे विरोधात तक्रार नाही पण वकील आणि पक्षकार यांना वाईट प्रकारची वागणूक मिळू नये व त्यांचे अखत्यारीत असणारे कामे वेळेवर व्हावीत हिच अपेक्षा आहे वकील संघाची आहे. याबाबत पोलिस अधीक्षक श्री पाटील यांना पण मदत करण्यासाठी सांगितले, असता एसपी श्री पाटील आणि श्री अग्रवाल यांनी सुध्दा मदत करण्याचे आश्वासन दिले.

फॅमिली कोर्ट मधून गेलेले समन्स, वाॅरंट यांची बजावणी वेळेवर होत नाही, तसेच रिपोर्ट सुद्धा वेळेवर येत नाहीत. महिलांना आणि पुरूषांना त्यांचे फॅमिली प्रकणात मदत करणे कामी भरोसा सेलची निर्मिती अहमदनगर येथे झाली आहे. परंतु अनेक लोकांना तेथे मेडिएशनसाठी असलेले मेडिएटर व्यवस्थित वागणूक देत नाहीत. तसेच एखाद्या व्यक्तीचे न्यायालयात प्रकरण चालू असेल तर त्याबाबत सुद्धा दखल घेतली जात नाही. तसेच वकीलांना सुद्धा चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे भरोसा सेलमध्ये प्रशिक्षीत आणि अनुभवी महिला व पुरुष पोलिसांची नेमणूक केली असे प्रश्न उद्भवणार नाहीत, अशी विनंती वकील संघाचे पदाधिकारी यांनी केली आहे. याबाबतीत पोलिस प्रशासन यांचे कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड शिवाजी अण्णा कराळे, उपाध्यक्ष ॲड लक्ष्मणराव कचरे,कार्याध्यक्ष ॲड सुरेश लगड, सचिव ॲड अनिताताई दिघे, सहसचिव ॲड अर्चनाताई शेलोत खजिनदार ॲड राजेश कावरे, सदस्य ॲड एम बी अंबेकर, ॲड राजाभाऊ शिर्के ॲड शिवाजी सांगळे, ॲड अनुराधाताई येवले, ॲड सुचिताताई बाबर, ॲड सत्यजीत कराळे हे सर्व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments