गावठी कट्टा दाखवायला गेला अन .... गोळी सुटली

गावठी कट्टा दाखवायला गेला अन .... गोळी सुटली

 वेब टीम  कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे काल सकाळी साडेदहा वाजता आपल्या भाऊजाईला गावठी कट्टा दाखवायच्या नादात आरोपी विशाल भालेरावकडून गोळी सुटली आणि ती थेट भाऊजयी सुनिता संजय भालेराव (वय 32 वर्ष) यांच्या डोक्यात शिरली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता भालेराव यांना उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आरोपी विशाल भालेराव व त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले होते. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली होती.शिर्डी पोलीस स्टेशनचे डीवायएस पी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सानप, शेख, बाळकृष्ण वर्पे, दळवी आरोपींचा शोध घेण्यासाठी माहिती संकलित केली व 

 गोळीबार करणारा मुख्य आरोपीला विशाल भालेराव याला पोलिसांनी  अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी करत आहे.

Post a Comment

0 Comments