साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानकडून गुणवंतांचा सत्कार

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानकडून गुणवंतांचा सत्कार 

वेब टीम नगर : समाजात गरजू व खरी मदतीची गरज असलेल्या घटकांना मदत दिली पाहिजे. ‘कर भला तो हो भला’ ही साईबाबांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणुन साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानकडून गुणवंतांचा गौरव करुन सामाजिक संस्थांतील चिमुकल्यांना केलेली छोटीशी मदतही लाखमोलाची आहे,असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.वसंत टेकडी येथील साई मंदिरात इ.10 वी, 12 वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच उत्कर्ष बालगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव योगेश पिंपळे, अलिम पठाण, साहिल शेख, युवराज गुंड, आकाश त्र्यंबके, गौरव राऊत, तिरमेस पासकंट्टी, अभिषेक खामकर, राणी चौधरी, आदिसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे योगेश पिंपळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बालकांना वह्या, पेन, कंपास, खेळणी वाटप केले.पुढे बोलतांना नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले, साईबाबांनी दिलेली शिकवण कृतीमधून करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. गजरवंतांना केलेली मदत ही सत्कारणी लागते. बालघरातील या चिमुकल्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य छोटी वस्तू असली तरी ती त्यांच्या मनाने लाख मोलाची आहे.प्रास्तविकात योगेश पिंपळे म्हणाले, वाढदिवसाला व्यर्थ खर्च न करता चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी दिलेले साहित्य ही खरी मदत झाल्याने मनाला समाधान वाटते. गुरुपौर्णिमा उत्सव हा भाविकांसाठी एक पर्वणी असते. 

11 जुलै रोजी हभप इंदोरीकर महाराजांचे किर्तन, 12 रोजी साईबाबांच्या रथासह हत्ती, घोडे, बॅण्ड पथकासह भव्य मिरवणुक. दि. 13 रोजी हभप ढोक महाराज यांचे किर्तन होईल. असा तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरे होणार असल्याचे श्री.पिंपळे यांनी सांगितले.यावेळी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.यामध्ये डॉ.अमित महांडूळे, डॉ.शितल महांडूळे, डॉ.किरण वाघ, डॉ.आश्विनी वाघ, डॉ.अरुण वाघ आदिंनी रुग्णांची मोफत तपासणी करुन साई-चरणी सेवा दिली. यासर्वांचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments