डिव्हायडरला कार धडकून अपघातात १ ठार १ जखमी
वेब टीम नगर : नगर पुणे महामार्गावर चास ता. नगर शिवारात कार रस्ता दुभाजकाला आदळून बाजूने येणाऱ्या ट्रकवर धडकून भीषण अपघात झाला.यामध्ये एक जण ठार तर एक जखमी झाला आहे.
हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सात वाजता झाला.विजय संतोष पवार वय ३५ रा.म्हसणे ता.शिरूर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर त्यांचे सहकारी जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,पवार हे स्विफ्ट कारने नगरहून पुण्याच्या दिशेने जात होते.चास शिवारातील घोंगडे वस्तीजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकाला धडकून विरुद्ध बाजूने येणार्या ट्रकवर आदळली.स्थानिक नागरिकांनी दोघांना उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी पवार यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments